Ramesh Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

बदली झाल्याने कामे पूर्ण करता येणार नाहीत!

Sampat Devgire

नाशिक : गोदावरी नदी प्रदूषणमुक्त (Godawari river polluation free drive) करणे हे माझे स्वप्न होते. त्यासाठी ‘नमामि गोदा’ प्रकल्प हाती घेतला. गोदामाईच्या सेवेसाठी माझी नियुक्ती झाली, अशी माझी भावना होती. आता बदली झाल्याने काम पूर्ण करता येणार नाही, अशी खंत महापालिकेचे (Nashik Municiple corporation) माजी आयुक्त रमेश पवार (Ramesh Pawar) यांनी व्यक्त केली. (Ramesh Pawar said my appointment was made for Godawari river drive)

महापालिका आयुक्तपदाची सूत्रे चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शनिवारी स्वीकारली. त्या अनुषंगाने माजी आयुक्त पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, की गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करणे त्याचबरोबर गोदावरीचे सौंदर्य वाढविणे या उद्देशाने गोदा प्रकल्प हाती घेतला. प्रकल्पाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या सुरू आहे. फाइलवर स्वाक्षरी कारणे एवढेच काम शिल्लक राहिले.

मात्र, अचानक बदली झाल्याने काम पूर्ण होऊ शकले नाही. याचे शल्य राहील. आयुक्तपदावर काम करत असताना अग्निप्रतिबंधक व अग्नीसुरक्षा स्वतंत्र पातळीवर असावे, अशी भूमिका होती. मात्र, बदलीमुळे हा बदल करता येणार नाही. महापालिकेचे दायित्व कमी करताना आर्थिक शिस्त लावण्यात यश आले, याचे समाधान आहे. उड्डाणपुलाबाबत निर्णय घेताना आयआयटी संस्थेच्या अहवालानुसार मी निर्णय घेतला.

कम्युनिकेशन गॅपमुळे अनुपस्थिती

नवनियुक्त आयुक्तांनी पदभार स्वीकारताना विद्यमान आयुक्तांनी उपस्थित राहावे, असा संकेत आहे. परंतु, रमेश पवार अनुपस्थित राहिले. यावर बोलताना त्यांनी नवीन आयुक्त पदभार स्वीकारतील याची कल्पना नव्हती. मात्र, कामानिमित्त मला ठाण्याला जावे लागले. नवीन आयुक्त पुलकुंडवार यांनी पदभार स्वीकारत असल्याचे सांगितले. कम्युनिकेशन गॅपमुळे मी उपस्थित राहू शकलो नाही. शासन जी जबाबदारी दिली, ती स्वीकारण्यास तयार असल्याचे पवार यांनी सांगितले.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT