Harshvardhan Sapkal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal News: हर्षवर्धन सपकाळांचा RSS वर थेट हल्ला; ‘आदिवासी संस्कृती संघापेक्षा श्रेष्ठच'

Harshvardhan Sapkal ON Tribal Day: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना वनवासी संबोधतो. त्यांना या माध्यमातून आदिवासींची मूळ ओळख आणि संस्कृती नष्ट करायची आहे. त्यासाठी अतिशय कावेबाजपणे त्यांचे काम सुरू आहे.

Sampat Devgire

Harshvardhan Sapkal News: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तिखट शब्दात हल्ला केला आहे. संघ हा आदिवासी संस्कृती संपविण्यासाठी काम करीत आहे. त्यांच्यापासून आदिवासींना सावध राहावे लागेल, असे ते म्हणाले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिक येथे आदिवासी मेळावा झाला. यावेळी सपकाळ यांनी संघ आणि राज्यातील भाजप सरकारवर टीका केली. राज्यातील सरकार आदिवासींच्या जमिनी आणि संपत्तीवर आक्रमण करीत असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिवासींना वनवासी संबोधतो. त्यांना या माध्यमातून आदिवासींची मूळ ओळख आणि संस्कृती नष्ट करायची आहे. त्यासाठी अतिशय कावेबाजपणे त्यांचे काम सुरू आहे. जल जंगल आणि जमीन यांच्या रक्षणासाठी आदिवासी बांधवांना संघर्ष करावा लागेल. त्यांचे अधिकार हिरावून घेण्याचे कारस्थान सरकार करीत आहे. त्यामुळे त्या विरोधात आंदोलनाची तयारी ठेवावी लागेल, असे सपकाळ म्हणाले.

यापूर्वी आदिवासींच्या जमिनी विक्री किंवा हस्तांतरित केल्या जात नव्हत्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदिवासींच्या जमिनी 99 वर्षाच्या कराराने देण्याचा नियम केला आहे. अशा नियमांमुळे आदिवासींची लूट निश्चित आहे. त्यामुळे आगामी काळ हा आदिवासींसाठी कठीण आहे.

राज्य सरकार विविध माध्यमातून सत्तेचा वापर आदिवासींची कोंडी करण्यासाठी करीत आहे. विरोधात जागरूक राहून संघर्ष करण्याची तयारी ठेवावी लागेल.

रस्ते दुरुस्ती, नालेसफाई आणि पैसे कमावणे म्हणजे विकास होत नाही. आपल्या श्रेष्ठ संस्कृतीचे संवर्धन करणे हा करा विकास आहे. पंचमहाभूतांना देव मानणे ही आदिवासींची संस्कृती आहे. ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघापेक्षा निश्चितच श्रेष्ठ आहे, असे ते म्हणाले.

काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ त्यांनी राज्यातील भाजप सरकार आदिवासींची विविध प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहे. समाजातील युवकांनी हे कारस्थान समजून घेतले पाहिजे. शिक्षित आणि जानकर होऊन त्याचा सामना करण्याची गरज आहे, यावर भर दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT