Tribal Student Agitation News: राज्य शासनाने पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थ्यांना डिवचले आहे. त्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आंदोलनासाठी एकवटले. या विद्यार्थ्यांनी काल नाशिक शहरात शक्ती प्रदर्शन केले. गेल्या चार दिवसांपासून राज्यातील आदिवासी विद्यार्थी नाशिक येथे आंदोलन करीत आहे.
राज्याच्या अन्य भागात देखील हे आंदोलन सुरू आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांना आश्वासन दिले. मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. आदिवासी विद्यार्थ्यांनी काल आपल्या मागण्यांसाठी नाशिक शहरात मोर्चा काढला. हा मोर्चा आदिवासी विकास कार्यालयासमोर आल्यावर शहरातील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे पोलीस यंत्रणा देखील हतबल झाल्याचे चित्र होते.
त्यावेळी आदिवासी आयुक्तांनी कार्यालयात त निवेदन घेण्याची प्रथा आहे. मात्र आक्रमक विद्यार्थ्यांच्या शक्ती प्रदर्शना पुढे प्रशासन झुकले. आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांना रस्त्यावर यावे लागले. यावेळी व्यासपीठावर जाऊन आंदोलन घेण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी केला. पोलिसांनी परिस्थितीचा अंदाज घेत आयुक्तांना व्यासपीठावर जाण्याची सूचना केली.
यावेळी व्यासपीठावर जाण्यासाठी पायऱ्याच नव्हत्या. त्यामुळे आयुक्त लीना बनसोड यांची मोठी कुचंबना झाली. पोलिसांनी दोन खुर्च्या एकत्र करून स्टेज जवळ नेल्या. त्याचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुभाजकाचा आधार घेत व्यासपीठावर चढवून लीना बनसोड यांनी निवेदन स्वीकारले. विद्यार्थ्यांच्या भावना आणि मागण्या शासनाला कळविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील विविध आदिवासी वस्तीगृहांमध्ये आतापर्यंत 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.. या प्रश्नावर माझी आदिवासी विकास मंत्री वसंत पुरके यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना मांडली. सेंट्रल किचन रद्द करावे आणि पेसा अंतर्गत भरती तातडीने सुरू करावी या प्रमुख मागण्या होत्या.
राज्य शासनाने या संदर्भात ठोस उपाय योजना केलेल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. काँग्रेस सह विविध राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आदिवासी जेन झी चा एल्गार शासन आणि प्रशासनाला त्रस्त करून गेला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.