Manoj Jarange Patil : "प्रत्येक उपोषणाला लाल गोधडीच का लगाते, त्यामागे काय दडलंय?"; लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर गंभीर आरोप

Laxman Hake on Manoj Jarange hunger strike : गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके देखील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
OBC leader Laxman Hake has questioned Manoj Jarange Patil’s hunger strike amid the ongoing Maratha reservation protest.
OBC leader Laxman Hake has questioned Manoj Jarange Patil’s hunger strike amid the ongoing Maratha reservation protest.Sarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil Protest : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असतानाच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या उपोषणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “जो ‘मी डिफेंडर गाडीमधून फिरू शकतो’ असं म्हणतो, तो काय उपोषण प्रामाणिकपणे करणार?” असा सवाल करत हाके यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर संशय व्यक्त केला आहे.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने ‘महा एल्गार मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही हाके मुंबईच्या दिशेने जाण्यावर ठाम आहेत. हाके मुंबईच्या दिशेने निघाले असून त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. याच आंदोलनादरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली.

“आज जरांगे यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे,” असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता लक्ष्मण हाके म्हणाले, “ते पाच काय, दहा दिवसही उपोषण करतात. त्यांना प्रत्येक उपोषणासाठी ती लाल गोधडीच का लागते? ‘मी डिफेंडर गाडीमधून फिरू शकतो’ असं म्हणणारा माणूस उपोषण प्रामाणिकपणे करणार का?” असा सवाल त्यांनी केला.

OBC leader Laxman Hake has questioned Manoj Jarange Patil’s hunger strike amid the ongoing Maratha reservation protest.
Shivena hearing : शिवसेना पक्ष, चिन्हावर सुनावणी सुरू होण्यापूर्वीच दिल्लीतून एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण' संदर्भात मोठं वक्तव्य

जरांगे पाटील यांच्या उपोषणावर संशय व्यक्त करताना हाके पुढे म्हणाले की, “शासनाकडे त्यांचे रिपोर्ट आणि ब्लड रिपोर्ट आहेत. उपोषण करणाऱ्या व्यक्तीच्या ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट कशा येतात, हे दिसून येतं. त्यामुळे याचीही एकदा चौकशी झाली पाहिजे."

मनोज जरांगे पाटील वारंवार आंदोलन आणि उपोषण करतात. त्यांच्या आंदोलनाच्या पद्धतीवरही हाके यांनी प्रश्न उपस्थित केले. “मनोज जरांगे वारंवार जे आंदोलन करतात, ते कसं करतात? त्या लाल गोधडीमागे दडलंय काय?” असा सवाल हाके यांनी केला.

OBC leader Laxman Hake has questioned Manoj Jarange Patil’s hunger strike amid the ongoing Maratha reservation protest.
PCMC politics : "माझी सहनशीलता संपली"; म्हणत महापौरांनी भाजप नगरसेवकांनाच दिला निलंबित करण्याचा इशारा; पक्षाअंतर्गत नाराजीला तोंड फुटणार?

तसंच हाकेंनी प्रसाद लाड, शंभूराज देसाई आणि राधाकृष्ण विखे पाटील हे जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रसद पुरवत असल्याचा आरोप केला. “जरांगेंना भेटायला जेवढी माणसं जातात, त्या सगळ्यांचा काही ना काही राजकीय स्वार्थ आहे,” असा आरोपही केला.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही आंदोलनांवर सरकारची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com