Nashik Politics : मनीपूरच्या घटनेचे तीव्र पडसाद आता सर्वस्तरावर उमटू लागले आहेत. काल विविध राजकीय पक्षांनी याविरोधात निर्दर्शने करीत भाजप व पंतप्रधानांचा निषेध केला. आदिवासी संघटनांनीही याबाबत निदर्शने करीत मनीपूर घटनेमुळे आगामी निवडणुकीत भाजपला पराभूत करू असा इशारा दिला, (Political parties & Trible organisations protested against BJP on Manipur issued in City)
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार), कम्युनिस्ट पक्ष (CPI) तसेच आम्ही भारताचे लोक आणि आदिवासी (Trible) संघटनेसह विद्यार्थ्यांनीही मनीपूरमधील पिडीत नागरिकांना पाठींबा व्यक्त करीत केंद्र सरकारचा निषेध केला.
यासंदर्भात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने झाली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले.
यावेळी श्री. जाधव म्हणाले, मणीपूरची सध्याची स्थिती व महिला, आदिवासींवरील अत्याचार विचारात घेता तेथील राज्य सरकार तात्काळ बरखास्त करावे. राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.मैतेई घटकांचा आदिवासीं कुकी, नागा जमातीत समावेश केल्याने मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. आदिवासींचे घरे जाळून आदिवासी महिलांवर अत्यंत वाईट अत्याचार होत आहेत. आदिवासी बांधवांना गोळ्या घालून ठार केले जात आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनांबाबत पंतप्रधान मौन आहेत. त्यामुळे ते पदावर राहण्यास अपात्र आहेत. आगामी निवडणुकीत आदिवासी मतदार त्यांना सत्तेतून खाली खेचतील, असा इशारा देण्यात आला.
मैतेई घटकांचा आदिवासीं कुकी, नागा जमातीत समावेश केल्याने मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. आदिवासींचे घरे जाळून आदिवासी महिलांवर अत्यंत वाईट अत्याचार होत आहेत. आदिवासी बांधवांना गोळ्या घालून ठार केले जात आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनांबाबत पंतप्रधान मौन आहेत. त्यामुळे ते पदावर राहण्यास अपात्र आहेत. आगामी निवडणुकीत आदिवासी मतदार त्यांना सत्तेतून खाली खेचतील, असा इशारा देण्यात आला.
`आम्ही भारताचे लोक` बॅनरखाली काढण्यात आलेल्या मूकमोर्चात विविध संघटना सहभागी झाल्या. माजी आमदार सुधीर तांबे, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, शांताराम चव्हाण, राजू देसले, किरण मोहिते, माजी नगरसेवक मनीष बस्ते, हेमा पटवर्धन, विजय बागूल, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यात भाग घेतला. मणीपूरच्या घटनेच्या निषेधार्थ झालेल्या या घटनांमुळे शहर काल आंदोलनाचे शहर झाले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.