Trimbakeshwar Temple Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वराच्या दारात भाविकांची फसवणूक, 600 रुपयांची दर्शन तिकीटे विकली 2 हजाराला

Trimbakeshwar Darshan Ticket Scam : गुजरात राज्यातील सुरत येथून काही भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आले होते. एकाने त्यांना व्हीआयपी दर्शनासाठीची प्रत्येकी दोनशे रुपये मूल्याची तीन तिकिटे दोन हजार रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे.

Ganesh Sonawane

Nashik Latest News : नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात देशासह जगभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने दर्शनासाठी कायमच येथे रांगा लागतात. मंदिरात दर्शनासाठी होणारी प्रचंड गर्दी टाळण्यासाठी आणि वेळेची बचत करण्यासाठी अनेक भाविक जलद दर्शनाच्या शोधात असतात. त्याचाच फायदा घेऊन त्र्यंबकेश्वरला भाविकांची फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन खोटे पास विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २२ मार्च रोजी घडलेला हा सगळा प्रकार आहे. गुजरात राज्यातील सुरत येथून काही भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांना भेटलेल्या एका व्यक्तीने व्हीआयपी दर्शनासाठीची प्रत्येकी दोनशे रुपये किमतीची तीन तिकिटे दोन हजार रुपयांना विकल्याचं समोर आलं आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर भाविकांनी त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट कार्यालयात लेखी तक्रार केली. त्यानंतर ट्रस्टने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली असता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी सीसीटीव्ही तपासात संशयित नारायण मुर्तडक या तरुणाने ही तिकिटे विकल्याचे दिसून आले. यानंतर याप्रकरणी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित माचवे यांनी पोलिसांकडे मुर्तडक याच्याविरुद्ध ठकबाजीचा गुन्हा नोंदवला आहे.

कसं आलं लक्षात ?

दर्शन पाससाठी संबंधित भाविकांचा आधार क्रमांक जुळवला जातो. तिन्ही पास इतरांच्या आधार क्रमांकावर काढलेली असल्याने सुरतच्या भाविकांचे आधार क्रमांक त्याच्याशी जुळले नाहीत. त्यामुळे मंदिराच्या प्रवेशद्वारी असलेल्या संगणकीय स्कॅनिंग यंत्राने ती स्वीकारली नाहीत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी या भाविकांना प्रवेश दिला नाही, त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

देवस्थान ट्रस्टने याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले आहेत. संबधित फुटेज राखून ठेवण्यात आले आहे. २३ मार्च २०२५ रोजी अमित माचवे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावरून मंगळवारी (ता. १५ एप्रिल) फिर्याद दाखल करून घेण्यात आली. याबाबत नारायण मुर्तडक या व्यक्तीवर कलम ३१८ (४) प्रमाणे ठकबाजीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT