Tanpure Sugar Factory : तनपुरे कारखान्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घालणार, आर्थिक संकटातून काढणार बाहेर!

Eknath Shinde Tanpure Sugar Factory : एकनाथ शिंदे म्हणाले, तनपुरे साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद पडलेला कारखाना पूर्ववत सुरू करावा लागेल. त्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी मदत केली जाईल.
Eknath Shinde
Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Tanpure Sugar Factory News : तनपुरे साखर कारखाना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत केली जाईल. मी तुमच्या पाठीशी खंबीर उभा आहे, अशी ग्वाही शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, अशी माहिती शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष राजू शेटे यांनी दिली.

तनपुरे साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी विकास मंडळाची पुनर्स्थापना करून पॅनल उभा करण्याची घोषणा केल्यावर नवनिर्वाचित अध्यक्ष राजू शेटे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी शेटे यांना ग्वाही दिली. यावेळी शिवसेनेचे राज्य प्रवक्ते संजीव भोर उपस्थित होते.

शेटे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर तनपुरे साखर कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. कारखान्यावरील कर्जाच्या थकबाकीपोटी जिल्हा बँकेने केलेली मालमत्ता जप्तीची कारवाई, कामगारांची देणी, शासकीय देणी व

Eknath Shinde
Navi Mumbai : गणेश नाईकांचा मंदा म्हात्रेंशी पुन्हा पंगा, मतदारसंघातही ठरतायत वरचढ

इतर देणी, कारखाना बंद पडण्याची कारणे, कारखाना संलग्न शैक्षणिक संस्थांच्या समोरील विविध समस्या, ऊस तोडणीसाठी शेतकरी सभासदांची होणारी ससेहोलपट व आर्थिक नुकसान आदींची आकडेवारीसह माहिती दिली.

शिंदे म्हणाले, तनपुरे साखर कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद पडलेला कारखाना पूर्ववत सुरू करावा लागेल. त्यासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी मदत केली जाईल. कारखान्याच्या आगामी निवडणुकीत शेतकरी विकास मंडळाचा पॅनल उभा करावा. या पॅनलला विजयासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. तुमच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

शिवसेना राज्य प्रवक्ते संजीव भोर यांनी मागील १५ वर्षापासून कारखान्याच्या संघर्षात राजू शेटे यांनी भाग घेतल्याचे सांगितले. जिल्हा बँकेतर्फे तनपुरे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी चार वेळा निविदा प्रक्रिया केली, कामगार, सभासद त्यांच्या हितासाठी स्वखर्चाने तळमळीने शेटे यांनी केलेला संघर्ष, कारखाना सभासदांच्या मालकीचा राहण्यासाठी न्यायालयीन लढाईतील सहभाग, कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्याची प्रामाणिक तळमळ असल्याचे सांगितले.

Eknath Shinde
Ranjit Kasale: कासले गिरवणार कराडचा कित्ता; पुणे पोलिस अलर्ट; VIDEO व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com