Purshottam Kadlag
Purshottam Kadlag Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP News : देवेंद्र फडणवीसांना त्र्यंबकेश्वरचे सौहार्द पसंत नाही का?

Sampat Devgire

Trimbakeshwar Issue News : त्र्यंबकेश्वर हे शांत व गुण्यागोविंदाने नांदणारे तीर्थस्थळ आहे. येथे कोणताही वाद नाही. दोन दिवसांपूर्वी संदलच्या मिरवणूकीच्या निमित्ताने याबाबत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. गावातील या किरकोळ प्रकाराबाबत बाहेरच्या लोकांचे ऐकुण एसआयटी नेमण्याची गरज नव्हती, असे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे. (Trimbakeshwar is a peacefull pilgrimage city, outsiders shall not disrupt it)

त्र्यंबकेश्वर (Nashik) येथे किरकोळ प्रकार घडला त्याचा काही बाहेरच्या संघटनांनी खुप बाऊ करून शहराच्या प्रतिमेला बाधा आणली. त्याने भाविकांची संख्या कमी होऊ शकते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी याबाबत वास्तव माहिती घ्यायला हवी होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पुरषोत्तम कडलग यांनी म्हटले आहे.

याबाबत कडलग म्हणाले, गेल्या दोन तीन दिवसांपासून काही माध्यमांतून ब्रेकींग न्यूजच्या नावाखाली विविध गैरसमज पसरवणाऱ्या वास्तव नसलेल्या बातम्या प्रसारीतहोत आहेत. मुस्लीमांनी चादर चढवण्याचा प्रयत्न केला, गृहमंत्र्यांना दुरध्वनी वगैरे असे त्याचे स्वरूप आहे. प्रत्यक्षात असे काहीही झालेले नाही. मंदिराच्या पायरीवर धुप दाखविण्याची संदलची परंपरा आहे. त्यात सर्व स्थानिक लोक आहेत. मात्र बाहेरची मंडळी गैरसमज पसरेल असे काम करीत आहे. हा विषय गावातच मिटण्याचा आहे.

या प्रकारामुळे पोलिसांनी दक्ष व्हावे लागले. लगेच मंदीराला पोलिसांची भेट, पाहणी, विचारपुस वगैरे झाले. त्यानंतर पोलिस ठाण्यात बैठक झाली. त्यात देखील त्यात हे सर्व स्पष्टीकरण झाले. नवीन पिढी असल्याने त्यातील काहींनी मंदिरात जाण्याची परवानगी मागितली होती. ती नाकारल्यावर ते निघून गेले. त्यामुळे याबाबत गैरसमज पसरवू नयेत. त्र्यंबकेश्वरच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होऊन भाविकांची संख्या रोडवण्याची भिती आहे. ग्रामस्थांत काहीही विसंवाद नाही. सर्व सुरळीत आहे.

आज याबाबत त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या सभागृहात सर्वप्रतिनिधींची बैठक झाली. त्यात या विषयावर चर्चा झाली. हा प्रकार गावातील किरकोळ प्रकार असुन तो गावातच मिटू शकतो. त्यात बाहेरच्या माध्यमे व संघटनांनी भाग घेऊन न घडलेल्या घटनेबाबत गैरसमज पसरवू नये असे मत व्यक्त करण्यात आले. या बैठकीस माजी नगराध्यक्ष पुरषोत्तम लोहगावकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पुरषोत्तम कडलग, भाजपचे शहराध्यक्ष सुयोग वाडेकर, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वास्त भुषण अडसरे, ज्येष्ठ नेते सुरेश गंगापूत्र, बाळासाहेब सावंत, लक्ष्मीकांत थेटे, गिरीष जोशी, प्रभाकर जोशी, रवींद्र सोनवणे, उमेश सोनवणे, बाळासाहेब कदम आदींसह सर्वपक्षीय प्रतिनिधी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT