Manikrao Kokate News : सिन्नर बाजार समितीच्या निवडणुकीत कट्टर विरोधक आमदार माणिकराव कोकाटे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना समसमान नऊ जागा मिळाल्या आहेत. उद्या (ता.१८) सभापतीपदाची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमिवर कोकाटे गटाची एक महिला संचालक स्वतंत्र सहलीला गेल्याने कोकाटे गट अतिशय सावध झाला आहे. (Sinner APMC chairmen election will take palce tommarrow)
सिन्नर (Sinnar) बाजार समितीच्या निवडणुकीत (APMC) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) आणि शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना समसमान ९ जागा मिळाल्या आहेत. उद्या सभापतीपदाच्या निवडणुकीत काय होते याची उत्सुकता वाढली आहे.
सिन्नर बाजार समितीच्या बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. त्यावर भावी राजकारण अवलंबून आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे दोन्ही गटांत समसमान संख्याबळ असल्याने चिठ्ठीवर फैसला होणार अशी चर्चा होती.
अशातच आमदार कोकाटे यांचे बंधू भरत कोकाटे तसेच मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या एक मोठ्या नेत्याने त्यात सुत्रे हलवल्याची चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे सदस्य सहलीला गेले असताना कोकाटे गटाच्या एक महिला संचालक पतीसह स्वतंत्र सहलीला गेल्या आहेत. त्या कोणाच्या संपर्कात नसल्याचे कळते. त्यामुळे राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या संचालकांना आपल्याकडे वळविण्यासाठी विरोधी गटाकडून उपसभापती अथवा सभापती पद देऊन तडजोड होऊ शकते, असे कार्यकर्त्यांत बोलले जाते आहे. त्यामुळे कोकाटे गटाला उद्या निवडणुकीत सावध रहावे लागेल. अन्यथा त्यांना धक्का बसेल अशी चर्चा निकटवर्तीय सुत्रांनी व्यक्त केली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निवडणुकीत आमदार कोकाटे यांनी अध्यक्षपदाची उमेदवारी केली होती. त्यात त्यांनी विरोधकांवर अनेक आरोप व स्वभावाप्रमाणे आक्रमक भूमिका घेतली होती. त्याने काही घटक नाराज झाले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा गट कोकाटे विरोधक माजी आमदार वाजे गटाला रसद पुरवत असल्याचे बोलले जाते. त्यातूनच या महिला संचालक पतीसह स्वतंत्र सहलीला गेल्या. त्यांच्यासह भरत कोकाटे यांचा फोन देखील नॉट रिचेबल असल्याने सभापती निवडणुकीबाबत कोकाटे सावधपणे पावले टाकत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.