IAS Tukaram Mundhe viral post Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांची एक्स'पोस्ट व्हायरल, सोशल मीडियावरील प्रसिद्धीपेक्षा ‘या’ गोष्टीला दिले महत्त्व

IAS Tukaram Mundhe viral post : एक धडाकेबाज व कडक शिस्तीचे अधिकारी अशी तुकाराम मुंढे यांची सुरुवातीपासूनच ओळख आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारल्यापासून ते अधिक लोकप्रिय झाले आहेत.

Ganesh Sonawane

IAS Tukaram Mundhe X post : एक अत्यंत प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. ते सध्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या धडाकेबाज कारवाया पाहाता त्यांची लोकप्रियता सध्या कमालीची वाढली आहे. अनेक बड्या राजकीय नेत्यांनाही मागे टाकेल, इतकी त्यांची चर्चा होताना दिसत आहे.

प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही मात्र त्याचा कोणताही गर्व त्यांच्या वागण्यात दिसून येत नाही. त्यांचे पाय अजूनही जमिनीवरच असल्याचे त्यांच्या एका व्हायरल पोस्टमधून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडियावरील वाढती लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी एक महत्त्वाची भूमिका मांडली आहे. अनेकांच्या दृष्टीने हिरो ठरलेल्या मुंढेंची विचार करण्याची पद्धतही त्यांच्या लोकप्रियतेइतकीच वेगळी असल्याचे त्यांनी केलेल्या पोस्टमधून दिसून येते. नेमके काय म्हणाले तुकाराम मुंढे? त्यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय का ठरत आहे?

समाजसेवा किंवा जनसेवा ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेली गोष्ट नसून ती मोठी जबाबदारी आहे. सोशल मीडियावर होणारी चमकोगिरी किंवा मिळणारी प्रसिद्धी ही चांगल्या प्रशासनाची कसोटी ठरू शकत नाही, अशी स्पष्ट भूमिका अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असलेल्या तुकाराम मुंढे यांनी मांडली.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीचेही तुकाराम मुंढे यांनी आपल्या पोस्टमधून वेगळ्या पद्धतीने मोजमाप केले आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा लोकांचा विश्वास अधिक मोलाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्यांसाठी त्यांचे हे विचार जणू आरसाच ठरत आहेत. मुंढे यांनी त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ हँडलवरून याबाबतची भूमिका मांडली आहे. त्यांच्या या पोस्टची प्रशासकीय, राजकीय तसेच सामाजिक वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

काय लिहलंय पोस्टमध्ये?

तुकाराम मुंढे यांनी, प्रसिद्धी नव्हे, जनतेचा विश्वास महत्वाचा असे त्यांनी म्हटले आहे. जनसेवा ही प्रसिद्धी मिळवण्याची धडपड नाही. ती जबाबदारीप्रती असलेली बांधिलकी आहे. दृश्यता लक्ष वेधून घेऊ शकते. सोशल मीडिया एखाद्या कामाची व्याप्ती वाढवू शकतो. पण यापैकी कोणतीही गोष्ट सुशासनाचे मोजमाप ठरू शकत नाही.

खरे मोजमाप हे आहे की, नागरिकांना अधिक सुरक्षित वाटते का, सरकारी संस्था, विभाग अधिक उत्तरदायी बनतात का आणि योग्य गोष्टींसाठी व्यवस्था ठामपणे उभी राहील, असा विश्वास लोकांना वाटतो का. उद्देश जनहिताचा असतो. मोजमाप जनतेच्या विश्वासाचे असते. अधिकारी व्यक्ती म्हणून किती प्रसिद्ध झाला, यापेक्षा त्याने ज्या प्रशासकीय यंत्रणेचा भाग आहे ती व्यवस्था किती सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवली, हे अधिक महत्त्वाचे आहे.

प्रशासनाचा अंतिम उद्देश व्यक्तींच्या प्रसिद्धीपेक्षा प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम आणि मजबूत करणे हा असला पाहिजे. एखादा अधिकारी येतो आणि जातो; परंतु जनतेचा विश्वास शासकीय संस्थांनी कायम टिकवायला हवा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT