Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

संजय राऊत यांच्या कार्यक्रमाला दोन्ही उपनेत्यांची दांडी?

खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला माजी नगरसेवकांसह दोन उपनेते अनुपस्थित.

Sampat Devgire

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेने (Shivsena) डॅमेज कंट्रोल करण्यासाठी नेते मैदानात उतरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) नाशिकमध्ये (Nashik) आले असता, त्यांनी शिवसेना भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला १५ माजी नगरसेवकांसह दोन उपनेते गैरहजर राहिले. (More then 15 ex corporators absent for Sanjay Raut`s Press Meeting)

गैरहजर राहिलेल्यांचा नियोजित कार्यक्रम असल्याचे समर्थन राऊत यांनी केले असले तरी नाशिक रोड येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याला माजी नगरसेवक अनुपस्थित राहिल्यास शिवसेनेत फार काही आलबेल आहे, असे म्हणणे चुकीचे ठरू शकते.

राज्यातील ४० आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी नवीन गट स्थापन केल्यानंतर ठाणे व नवी मुंबईसह परिसरातील आजी- माजी नगरसेवक खुलेआम त्यांना पाठिंबा देत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महत्त्वाचे नेते मैदानात उतरले आहे. डॅमेज कंट्रोल करताना शिवसेनेची ताकद किती आहे, हेदेखील आजमावून बघितले जात आहे.

त्याचाच हा एक भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असलेल्या संजय राऊत दोन दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्यानिमित्ताने शुक्रवारी त्यांनी शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ३५ पैकी १५ माजी नगरसेवक अनुपस्थित असल्याचे दिसून आले.

सुनील बागूल यांची अनुपस्थिती

शहरातील १५ माजी नगरसेवक अनुपस्थित असल्याबद्दल खासदार राऊत यांना विचारले असता, त्यांनी नियोजित कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाही. मात्र, ते भेटून गेल्याचा दावा केला. शिवसेनेचे उपनेते बबन घोलप अनुपस्थित होते. मात्र, त्यांचा मुलगा माजी आमदार योगेश घोलप उपस्थित राहिल्याने त्यांच्याबद्दल चर्चा झाली नाही. परंतु, दुसरे उपनेते सुनील बागूल यांची अनुपस्थिती मात्र अधिक चर्चेत आले. दरम्यान, शनिवारी (ता. ९) नाशिक रोड येथे पक्षाचा मेळावा असून, या मेळाव्याला कोण अनुपस्थित राहते, याकडे शिवसेनेचे लक्ष आहे. अनुपस्थित माजी नगरसेवकांची संख्या वाढल्यास नाशिक शिवसेनेत आलबेल नसल्याचे या निमित्ताने स्पष्ट होईल.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT