Uday Samant's recent comments on BJP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uday Samant : उदय सामंतांनी भाजपला पुन्हा डिवचलं, एकनाथ शिंदेंमुळेच महाराष्ट्रात महायुतीची सत्ता!

Uday Samant Targets BJP: राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपमधील जुन्या राजकीय जखमेवरील खपली निघण्याची शक्यता आहे. त्याला भाजपचे नेते काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे

Sampat Devgire

Nashik News, 12 Aug : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजपमधील जुन्या राजकीय जखमेवरील खपली निघण्याची शक्यता आहे. त्याला भाजपचे नेते काय उत्तर देतात याची उत्सुकता आहे.

उदय सामंत यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयांना दिले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण यांसह विविध राज्य हिताचे निर्णय घेतले. त्याला राज्यातील जनतेने मतदानातून प्रतिसाद दिला.

शिवसेना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नाशिकमध्ये झाली. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळावे यासाठी पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे. आम्ही निवडणूक पक्षाच्या राजकीय प्रभावासाठी प्रतिष्ठेची असल्याचा दावा सामंत यांनी केला.

एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपमुख्यमंत्री शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी अपेक्षा आहे. अशी भावना असण्यात काहीच गैर नाही. आगामी काळात एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आम्हाला निश्चितच आवडेल. याबाबत सहकारी आणि विरोधक दोघांनीही राग व्यक्त करण्याची आवश्यकता नाही.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने सर्व विरोधकांचा समाचार घेतला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे विरोधक संपले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राहिलेले विरोधक देखील संपुष्टात येतील. या निवडणुकांच्या निकालातून शिवसेना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाचे राजकीय भवितव्य पुन्हा एकदा अधोरेखित होईल असा दावा सामंत यांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ईव्हीएम यंत्र आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप घेतलेत. त्यालाही मंत्री सामंत यांनी आव्हान दिले. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सर्व खासदारांनी 'ईव्हीएम'मुळेच लोकसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे आंदोलन करण्याआधी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला पाहिजे, या शब्दात काँग्रेस नेत्यांना आव्हान दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT