Uddhav Thackeray Shivsena: ठाकरेंच्या शिवसेनेनं झटकली मरगळ..; भ्रष्ट अन् वाचाळ मंत्र्यांविरोधातला सगळा संताप बाहेर काढला

Nagpur Shivsena News: शिवसेनेत झालेली तोडफोड, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेली सर्व मरगळ झटकून सोमवारी (ता.11) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागपूर शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
Uddhav Thackeray Shivsena Nagpur .jpg
Uddhav Thackeray Shivsena Nagpur .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: शिवसेनेत झालेली तोडफोड, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आलेली सर्व मरगळ झटकून सोमवारी (ता.11) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नागपूर शहरात जोरदार आंदोलन करण्यात आले. महायुती सरकारमधील भ्रष्ट आणि वाचाळ मंत्र्यांविरोधात आक्रोश करताना दिलेल्या घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. भ्रष्टमंत्री आणि महायुती सरकारच्या विरोधातील हा आक्रोश महापालिकेच्या निवडणुकीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर शहरात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) सेनेला एकही विधानसभा मतदारसंघ सोडण्यात आला नव्हता. दक्षिण नागपूर या हक्काच्या मतदारसंघावरही महाविकास आघाडीच्या धर्मामुळे उद्धव सेनेला पाणी सोडावे लागले होते. दुसरीकडे रामटेक विधानसभेत काँग्रेसने आपला उमेदवार उभा केल्याने महाविकास आघाडीत खटके उडाले होते. त्यातच महायुतीची सत्ता आल्यानंतर तत्कालीन नागपूरचे संपर्क प्रमुख दुष्यंत चतुर्वेदी शिंदे सेनेत सहभागी झाले.

मुंबईचे नेते आणि संपर्कांच्या दुर्लक्षामुळे उद्धव सेनेच्या सैनिकांमध्ये नैराश्य आले होते. मुंबईच्या नेतेही दुर्लक्ष करीत होते. नागपूरकडे फारसे लक्ष देत नव्हते. स्वबळावर निवडणूक लढायची असले तर खर्चा तयारी स्वबळावरच करावी लागेल, पक्षाकडून आर्थिक मदत मिळणार नाही असे स्पष्ट सांगितल्याने शिवसैनिकांमध्ये निराशा पसरली होती. कशाच्या आणि कोणाच्या बळावर महापालिकेची निवडणूक लढायची असा सवालही उपस्थित करण्यात येत होता.

बाहेरून आलेल्यांना डोक्यावर बसवल्या जात असल्याने शिवसैनिक अस्वस्थ होते. मध्यंतरी नागपूर, मुंबईसह महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. यावरून मोठे मतभेद उफाळून आले होते. आज मात्र सर्व मरगळ झटकून उद्धव सैनिकांच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.

Uddhav Thackeray Shivsena Nagpur .jpg
Kunal Kamra Tweet: शिंदेंना नडणारा कुणाल कामरा पुन्हा 'अ‍ॅक्टिव्ह'; ठाकरेंच्या पत्रकार परिषदेआधी 'ते' 4 शब्दांचंच ट्विट वादात

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या आंदोलनात किती कार्यकर्ते उपस्थित राहतात याकडे भाजपचे लक्ष होते. आंदोलनात शेकडो सैनिकांनी उपस्थित राहून उद्धव सेना अद्यापही जिवंत असल्याचे दाखवून दिले.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त नागपूरचे संपर्क प्रमुख सतीश हरडे, जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. महायुतीमधील भ्रष्ट नेत्यांचे राजीनामे घ्यावे असे फलक झळकवून रोष व्यक्त करण्यात आला. यावेळी कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, पन्नास खोके एकदम ओके, रमी खेळणारा मंत्री हवा का? अशा घोषणा देऊन शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला होता.

Uddhav Thackeray Shivsena Nagpur .jpg
Devendra Fadnavis: फडणवीसांचा गौप्यस्फोट; म्हणाले, 'देशात नरेंद्र,राज्यात देवेंद्रचा नारा होता,पण आम्ही गोपीनाथ मुंडेंनाच...'

आंदोलनात जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, पूर्व विदर्भाचे संघटक सुरेश साखरे, सागर डबरासे, महिला संघटक प्रमुख अंजुषा बोधनकर, महिला आघाडीच्या सुरेखा खोब्रागडे, सुशीला नायक, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे, मंगला गवरे, गंगाधर नाकाडे, टिंकू दिगवाह, महेंद्र कठाणे, हरी बानाईत, किशोर पराते, राजेश कनोजिया, मुन्ना तिवारी, विक्रम राठोड, अजित रानडे, प्रवीण दुबे, श्याम तेलंग यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com