Nashik civic polls prediction after Thackeray cousins' reunion Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Reunion of Thackeray's: उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्याने नाशिक महापालिकेत मॅजिक घडेल काय?

Uddhav and Raj Thackeray alliance's effect on Nashik local body elections: नाशिकच्या राज, उद्धव ठाकरे समर्थकांचा आज मनोमिलनाचा नवा अध्याय सुरू होणार.

Sampat Devgire

Shivsena MNS Reunion in Nashik अखेर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेना आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये त्याचा सकारात्मक संदेश गेला आहे. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाच्या बऱ्याच आधी मनोमन एकत्र येत विविध कार्यक्रम केले होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी युती होणार यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक शहरात ठाकरे समर्थकांमध्ये उत्साह वाढला आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यावर नाशिकमध्ये त्यांच्या समर्थकांनी एक पाऊल पुढे टाकत दोन्ही नेत्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते.

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला टार्गेट केले होते. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि माजी नगरसेवकांना सत्तेचा दबाव आणि अन्य मार्गाने भाजप तसेच शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश देण्यात आला होता. विशेष म्हणजे बहुतांशी प्रस्थापित नेत्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाची साथ सोडली होती. या स्थितीत आगामी महापालिका निवडणुकीत काय धोरण स्वीकारायचे हा गंभीर प्रश्न ठाकरे पक्षापुढे पडला होता.

शिवसेना आणि मनसेच्या संभाव्य युतीबाबत शहरात पदाधिकारी अतिशय उत्साही आहेत. त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनोमिलनासाठी आज एकत्रित बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होत आहे हे विशेष. त्यात युतीबाबत चर्चा होईल.

राज्य शासनाने तिहेरी भाषा धोरण स्वीकारत पहिलीपासून हिंदी सक्तीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला. त्यासाठी मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. त्याचा धसका घेऊन महायुती सरकारने हिंदी सक्तीचा अध्यादेश मागे घेतला. मात्र या निमित्ताने गेली वीस वर्ष अनेक प्रयत्न करू नये दुरावा असलेल्या राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्यात हिंदी सक्तीचा निर्णय कारणीभूत ठरला.

आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीकडून सत्ता आणि पैशांचा गैरवापर करून कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक फोडले जात होते. ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्यात नवे राजकीय मॅजिक घडणार आहे.

त्याचा धसका महायुती आणि विशेषतः शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने घेतला आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आज एकत्र येऊन आगामी वाटचालीबाबत धोरण ठरवतील असे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT