Balasaheb Thackeray Hindutva Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thackeray Hindutva : 'मला अजून कुणी हिंदूहृदयसम्राट कसं म्हणत नाही! हीच त्यांना आग'; उद्धव ठाकरे यांचा शाह अन् शिंदेवर प्रहार

Uddhav Thackeray launches fierce attack on Eknath Shinde, BJP and Amit Shah Shirdi rally, says Shiv Sena being turned into ‘Shahsena’ : शिर्डीतील सभेत उद्धव ठाकरेंचा भाजप, अमित शाह आणि एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल करत, ‘शिवसेनेची शाहसेना केली’ असा गंभीर आरोप केला.

Pradeep Pendhare

Uddhav Thackeray Shirdi Rally : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील ‘निष्ठेची वज्रमूठ’ मेळाव्यात आक्रमक भाषण करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा ‘शाहसेना’, असा उल्लेख करत केंद्रातील भाजप सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

'इतके खासदार फोडूनही ठाकरे का संपत नाहीत, हा त्यांना पडलेला प्रश्न आहे,' असे म्हणत ठाकरेंनी थेट निशाणा साधला.

शिर्डी (Shirdi) येथे आयोजित मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी 2029 मध्ये राज्यात पुन्हा आपले सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेनेवर टीकेची झोड उठवत, 'ठाकरे संपला तर महाराष्ट्रातून प्रश्न विचारणारा आवाज संपेल, म्हणूनच आम्हाला संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे,' असा गंभीर आरोप केला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “एवढे खासदार फोडूनसुद्धा ठाकरे का संपत नाही, हे त्यांना समजत नाही. कारण उद्धव ठाकरे ही फक्त व्यक्ती आहे; पण बाळासाहेब ठाकरे हा विचार आहे. तो विचार महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या आणि हिंदूंच्या मनामनात आजही जिवंत आहे.”

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करताना त्यांनी म्हटले, 'हिंदुहृदयसम्राट एकच होते आणि एकच राहतील, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे! त्यांची जागा घेण्याची ताकद कुणातही नाही. एवढं सगळं करूनही जर कुणाला स्वतःला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घ्यायचं असेल, तर ते शक्य नाही. कारण लोकांना बोगस आणि खरे यातील फरक कळतो.'

एकनाथ शिंदे शिवसेनेवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, 'ही फक्त शिवसेना फोडण्याची गोष्ट नाही. शिवसेना फोडली आणि तिला ‘शाहसेना’ बनवण्याचा प्रयत्न झाला. हा योगायोग नाही, तर नियोजनबद्ध राजकारण आहे.'

देशातील इतर पक्षांचा उल्लेख करत त्यांनी गंभीर आरोप केला की, 'ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस, आप, शिवसेने फोडत, त्यांना इतर पक्षात टाकले आहे. देशभरातील विरोधी पक्षांना कमकुवत करून लोकशाहीभोवती हुकूमशाहीचा पोलादी पाश आवळण्याचे कारस्थान सुरू आहे.' शिर्डीतून दिलेल्या या आक्रमक भाषणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध भाजप-शिंदे असा संघर्ष अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT