Uddhav Thackeray Attack : ‘पळालाय… सापडला तर सोडू नका’; उद्धव ठाकरेंच्या फर्मानानं 'खाऊ'साहेब वाकचौरेंचं वाढलं टेन्शन

Shirdi rally, Uddhav Thackeray launched fierce attack rebel MP Bhausaheb Wakchaure, calling him ‘Khausaheb’ and accusing him betrayal, corruption and political opportunism : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघात मेळावा घेत, गद्दारीवर जोरदार प्रहार केला.
Shirdi Sabha Uddhav Thackeray
Shirdi Sabha Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shirdi Sabha Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीतील जाहीर मेळाव्यात बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच वाकचौरे यांचा ‘खाऊसाहेब’ असा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी केली.

मी तुम्हाला सूचना करतोय, आपला खासदार पळाला आहे. सापडला तर सोडू नका, अजिबात परत आणू नका. ज्याच्या नसानसांत आणि रक्तात गद्दारी भरलेली असते, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा ‘खाऊसाहेब’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी, हा 'खाऊसाहेब' आहे जाऊ तिथं खाऊ. पण अनेक लोक भेटून सांगत आहेत की हा शुभ शकून आहे. 2009 मध्ये याला निवडून दिलं होतं, 2014 मध्ये हा पळाला आणि आपलं सरकार आलं. काँग्रेसमध्ये (Congress) गेला तिथे सरकार पडलं. आता शाहसेनेकडे गेला आहे, त्यामुळे त्यांचं सरकारही पडल्याशिवाय राहणार नाही, असा दावा केला.

शिर्डीच्या (Shirdi) भूमीचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, ही साईंची शिर्डी आहे. श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणारी भूमी आहे. पण यांना कोणावर श्रद्धाच नाही. रोज नवीन बाप शोधायची सवय आहे. आता चांगले दिवस येणार आहेत, त्यामुळे भ्रष्ट लोक आपल्यासोबत नको म्हणून देवानेच त्यांना दुसरी वाट दाखवली असेल.

Shirdi Sabha Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Shirdi Visit : 100 कोटींच्या टेंडरसाठी वाकचौरेंनी ठाकरेंना दिला दगा? रूपवते यांचा स्फोटक आरोप, ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी राजकारण तापलं

बंडखोर खासदारावर आणखी निशाणा साधताना ठाकरे म्हणाले, उद्धव ठाकरेंबद्दल काही बोलणार नाही म्हणतात, अरे खाऊसाहेब, तू काय बोलणार? लोक जोड्याने मारतील. हा माझ्याकडे आला होता तेव्हा म्हणायचा उद्धवसाहेब देवमाणूस आहेत. पण याचा डोळा नैवेद्यावर होता. खासदार गेल्यानंतर त्याच्या भानगडी आता लोक सांगत आहेत. साधा शिवसैनिक पदरमोड करून याला निवडून आणतो आणि तोच गद्दारी करतो.

Shirdi Sabha Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : आधी विमानाने एकत्र प्रवास, मग सावधानतेचा इशारा... अन् आता थेट ठाकरेंकडून फडणवीसांच्या खुर्चीसाठीच प्रार्थना

विकास निधीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. 15 कोटींचा विकास निधी मिळाला, पण खाऊसाहेबांनी त्यातील फक्त 70 लाख खर्च केले. हा करदात्यांचा पैसा आहे. पण आज फुटाफुटीचे दिवस सुरू आहेत. NEET पेपर फुटतो, खासदार फोडायला यांच्याकडे पैसे आहेत. नीच आणि नालायक लोक सत्तेत बसले आहेत, असा घणाघात ठाकरे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला लक्ष्य करत उद्धव ठाकरे म्हणाले, बैल नसल्यामुळे शेतकऱ्याची पत्नी स्वतः नांगर ओढते अशी बातमी आली, तेव्हा सरकारने बैल दिला. पण त्यापेक्षा खासदार फोडण्यासाठी वापरले जाणारे पैसे शेतकऱ्यांसाठी वापरले असते तर राज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं. शिर्डीतील या सभेत उद्धव ठाकरे यांनी बंडखोरी, फोडाफोडीचं राजकारण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्ला चढवत आगामी राजकीय संघर्षाची स्पष्ट रणशिंगे फुंकली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com