Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Local Body Election : उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्याआधीच गेम झाला ! मतदारयादीतून नावच गायब

Jalgaon Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरु असून स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि आरक्षण पाहून उमेदवार निश्चित केले जात आहेत.

Ganesh Sonawane

Jalgaon politics : मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. त्यासाठी विरोधकांकडून मुंबईत सत्याचा मोर्चा काढण्यात आला. अशातच मतदारयादीतील आणखी एक घोळ समोर आला आहे.

स्थानिक निवडणुकांची लगबग सुरु झाली असून स्थानिक पातळीवरील समीकरणे आणि आरक्षण पाहून उमेदवार निश्चित केले जात आहेत. अशात जळगाव जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संभाव्य उमेदवाराचेच नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. त्यामुळे आता शिवसेना ठाकरे गटाला ऐनवेळी दुसरा उमेदवार शोधावा लागणार आहे.

जळगाव ग्रामीणमधील धरणगाव नगरपालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाव्य उमेदवाराचे नाव जवळपास निश्चित केले होते. धरणगावच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा महिला सर्वसाधारण गटाचे आरक्षण घोषित झाले आहे. त्यामुळे ठाकरे सेनेने उपनेते गुलाबराव वाघ यांच्या मातोश्री रुखमाबाई रतन वाघ यांच्या नावाचा विचार केला होता. मात्र, मतदार यादी तपासल्यावर त्यांना झटकाच बसला.

रुखमाबाई रतन वाघ यांचे नाव मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार समोर आला. ठाकरे गटातर्फे त्यांचे नाव सर्वाधिक चर्चेत होते पण मतदार यादीतील या घोळामुळे धरणगाव शहराचे राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे.दरम्यान शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ यांनी हा सत्ताधाऱ्यांचा सुनियोजित डाव असल्याचा आरोप केला आहे.

आपल्या राजकीय विरोधकांनी कटकारस्थान रचून आईसह बहिणीचे नाव मतदार यादीतून गायब केले. निवडणूक एकतर्फी व्हावी यासाठी विरोधकांनी केलेला हा प्लॅन आहे. तब्बल १० ते १२ लाख रुपयांचा खर्च करून हे कटकारस्थान केल्याचा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला आहे. केवळ आपल्या कुटुंबियांचेच नाही तर असंख्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समर्थकांची नावेही यादीतून गायब केली असल्याचा आरोप गुलाबराव वाघ यांनी केला आहे.

दरम्यान या प्रकरणी ठाकरे गटाने धरणगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पक्षाने संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT