Uddhav Thackeray vs Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray vs Radhakrishna Vikhe : ठाकरेंच्या राजकारणावर मंत्री विखे बरसले; म्हणाले, 'त्यांचं दुर्दैव...'

Radhakrishna Vikhe Criticizes Uddhav Thackeray on Marathwada Flood Tour at Shirdi : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप महायुती सरकारकडे केलेल्या कर्जमाफीच्या मागणीवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Pradeep Pendhare

Radhakrishna Vikhe criticism Shirdi : अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी जीवन-मरण्याच्या उंबरठ्यावर आहे. राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी करून हेक्टरी 50 हजारांची मदत करावी. अन्यथा शेतकऱ्यांबरोबरच रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात केली.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे यांच्या दौऱ्याला राजकीय असल्याचे म्हणत, निशाणा साधला आहे.

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शेतकऱ्यांना दिलासा देत आहेत, इथपर्यंत ठिक आहे. मात्र पूरपरिस्थितीवर राजकारण करणे हे दुर्दैवी आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेत येण्यापूर्वी बांधावर जावून 50 हजार देणार, अशी घोषणा केली होती. मात्र सत्तेवर आल्यावर काहीही दिलं नाही."

'सत्तेवर असताना काही द्यायचं नाही आणि सत्ता गेल्यावर टिका करायची, एवढंच काम त्यांना आहे. उद्धव ठाकरेंनी मागणी करण्याची गरज नाही, सरकार खंबीर आहे द्यायला. आज शेतकऱ्यांना (Farmer) दिलासा देण्याची गरज आहे. मुक्ताफळे उधळण्याची नाही,' असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यावर संजय राऊत यांनी टिका केली होती. त्यावर बोलताना भाजप मंत्री विखे पाटील म्हणाले, "संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडलेले लोकांना दिसायला लागले आहे. अमित शहा केवळ कार्यक्रमासाठी आले नाही तर, राज्याच्या पूर परिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला आहे. केंद्र सरकारची काय मदत होईल, यासाठी चर्चा केली आहे. विरोधकांकडे कोणते मुद्दे राहिले नाहीत. शेतकऱ्यांशी देखील त्यांना काही घेणं देणं नाही. फक्त टिका करून माध्यमामध्ये राहणं हा विरोधकांचा धंदा आहे."

मंत्री विखेंनी सत्कार नाकारला

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी मतदारसंघातील राहाता इथं आयोजित नागरी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. जलसंपदा विभागाकडून कालव्यांच्या नुतनीकरणासाठी तब्बल 491 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने राहाता शहरात त्यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमुळे मंत्री विखे पाटील यांनी हा सत्कार टाळला.

नियम बाजूला सारत मदतीची तयारी...

महाराष्ट्रात पुराची परिस्थिती भयंकर आहे. त्यामुळे सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यात. काही ठिकाणी जावू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. 'एनडीआरएफ'चे निकष गेल्यावेळी कमी होते. मात्र आता तेही वाढवले आहेत. प्रसंगी नियम बाजूला करून शेतकऱ्यांना मदत करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न आहे. अजून मदतीचे निकष ठरवले नाही. गेल्यावेळेस केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करण्याची आमची भूमिका आहे. मदतीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होईल, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT