Harshwardhan Sapkal warning to BJP : 'सरकारला शेतकऱ्यांशी देणघेण नाही, राज्यात बंडाळीची स्थिती'; हर्षवर्धन सपकाळांनी दिला 'अलर्ट'

Buldhana Flood Damage Congress Leader Harshwardhan Sapkal Warns BJP Mahayuti Government : बुलढाणा इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप महायुती सरकारला सूचक इशारा दिला.
Harshwardhan Sapkal warning to BJP
Harshwardhan Sapkal warning to BJPSarkarnama
Published on
Updated on

Harshwardhan Sapkal Congress : राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप महायुती सरकारला 'अलर्ट' दिला आहे.

'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा साधताना, पूरस्थितीने वेढलेल्या शेतकऱ्यांचे सरकारला काहीच देणेघेणं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. राज्यात बंडाळीची स्थिती आहे,' असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी बुलढाणा इथं पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावर निशणा साधला. "दिल्लीला जाऊन काय दिवे लावणार? दोन जातीत भांडणे लावतील. दोन जातीत भांडणे लावून राज्याच लक्ष दुसरीकडे वळवतील. सरकारची शेतकऱ्यांविषयी काही देणेघेणे नाही, राज्यात बंडाळी सारखी परिस्थिती आहे," असा इशारा सपकाळ यांनी दिला.

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त परिसराची पाहणी करताना, शेतकऱ्यांचं (Farmer) अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं असून, सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये व कर्जमाफी करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. परंतु सरकारने शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत केली नाही. परंतु 2 ऑक्टोबरला राज्यातील काँग्रेस शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा सपकाळ यांनी दिला.

Harshwardhan Sapkal warning to BJP
Top 10 News : विदर्भात महाविकास आघाडी फुटणार? पत्रकाराच्या मुलाची हत्या, आता प्रियंका गांधींची एन्ट्री! Top Ten राजकीय घडामोडी...

मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याने प्रश्न विचारलं तर, मुख्यमंत्री त्याला राजकारण करू नको, असं म्हणत गप्प करतात! मुख्यमंत्र्यांचे हे असभ्य आणि असंस्कृतपणाचे लक्षण आहे, असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. विदर्भ वेगळा करू, लग्न करणार नाही, अजित पवार चक्की पिसिंग... पिसिंग.., या सर्व वक्तव्याची आठवण केली तर, हे सर्वात खोटारडे मुख्यमंत्री आहेत. त्यांची शेतकऱ्यांना मदत करण्याची नियत नाही, असा घणाघात देखील सपकाळ यांनी केला.

Harshwardhan Sapkal warning to BJP
Indian Air Force MiG 21 retirement : 'मिग-21'ची निवृत्ती, 1971चे भारत-पाक युद्ध; थेट ढाकाच्या राज्यपालाचे निवासस्थान लक्ष्य अन्...

राज्यात ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही साडी नेसवल्या जात आहेत, कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे आणि महिलांच्या साडीपर्यंत कार्यकर्त्यांचा हात जात आहे. कल्याणमध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्याला साडी नेसवली, त्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वाचा आम्ही लवकरच सन्मान करणार आहोत. या घटनेची गंभीर दखल राहुल गांधींनी घेतल्याचेही हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

'संभाजी भिडे यांनी केलेल्या विधानावर, हर्षवर्धन सपकाळ यांनी, किडे मधून-मधून वळवळ करत असतात. भिडेंनी केलेलं वक्तव्य हे सरकारला मदत म्हणून आहे, कारण अशा वक्तव्यांमुळे सर्व माध्यम तिकडे वळतील आणि राज्याचं लक्ष तिकडे जाईल अन् शेतकरी मागे पडेल. मुख्यमंत्र्यांनीच भिडेंना फोन करून हे वक्तव्य करायला सांगितलं असेल,' असा गंभीर आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

'अजित पवार यांनी कोणते सोंग, कधी अन् कसे घेतात याचे पूर्ण ज्ञान आहे. अजितदादांना चिरीमिरीवाल्या फाईलवर सही करताना, अदानी-अंबानीला मदत करताना काहीच वाटत नाही. मात्र शेतकऱ्यांना मदत करताना पैशाचं सोंग घेता येत नाही, असं म्हणता येत, अजित पवारांना शरम वाटली पाहिजे,' असा टोला हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com