Raj-Thackeray & Uddhav-Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Satyacha Morcha : नााशिकमधून ठाकरेंच्या मोर्चाला मुंबईत किती शिवसैनिक जाणार? उपनेते गायकवाड यांनी सांगितला मोठा आकडा..

Thackeray Satyacha Morcha Mumbai : मुंबईतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधून शिवसेना (उबाठा)ने तयारी केली आहे. नाशिकमधून या मोर्चासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक मुंबईत धडकणार आहेत.

Ganesh Sonawane

Mumbai Morcha : मतदारयांद्यांमधील घोळाकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील विरोधी पक्षांनी विशेषतः महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र मोर्चाची हाक दिली आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा विराट मोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चाची जोरदार तयारी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पारदर्शी पार पाडण्यासाठी मतदार यादीतील कथित घोटाळे आणि मतचोरीच्या विरोधात संविधान आणि लोकशाही वाचवण्याचा मुख्य नारा या मोर्चातून दिला जाणार आहे. नाशिकमधूनही या मोर्चाला मोठं बळ मिळणार असून शिवसेना, मनसेने मोठी तयारी केली आहे. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते दत्ता गायकवाड यांनी सांगितले की, नाशिकमधून नऊ हजार शिवसैनिक या मोर्चात सहभागी होतील.

या मोर्चाच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर शालीमार येथील शिवसेना कार्यालयात जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी नाशिकमधून कशाप्रकारे या मोर्चाची तयारी शिवसैनिकांनी केली आहे याची माहिती उपनेते गायकवाड यांनी दिली. ते म्हणाले की, मतदारयाद्यांमध्ये दोष असल्याचे पुराव्यांसह स्पष्ट करूनही राज्य निवडणूक आयोगाकडून दखल घेतली गेलेली नाही. सत्ताधारी पक्षाची व आयोगाची मिलीभगत असल्या शिवाय हे शक्य नाही. याद्यांमधील घोळ मिटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी आग्रही मागणी आम्ही मोर्चातून करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची एकीकडे निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष सजग असून त्यादृष्टीनेही तयारी सुरु आहे. आहे. याच बैठकीत तालुकाप्रमुखांकडून जिल्हा परिषदेसाठी गटनिहाय इच्छुक उमेदवारांची गटनिहाय माहिती घेत त्यांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. गट व गणातील इच्छुक, एकूण मतदार व गावे किती, गत निवडणुकीतील विजयी उमेदवाराचे नाव व त्याला मिळालेली मते, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, गटप्रमुख यांची नावे आदी माहिती संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या बैठकीला राज्य संघटक विनायक पांडे, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गिते, नितीन आहेर, प्रवीण नाईक, अनिल कदम यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा लोकसभा संघटक निवृत्ती जाधव, महानगरप्रमुख प्रथमेश गिते, सचिव मसूद जिलानी, उपजिल्हा प्रमुख भास्कर कोंडरे, महेश बडवे, दिलीप मोरे, निवृती जगताप, युवासेना जिल्हाधिकारी सागर कोकणे, स्थायी समितीचे माजी सभापती संजय चव्हाण, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख स्वाती पाटील, भारती जाधव, राहुल दराडे, महानगर समन्वयक शैलेश सूर्यवंशी, तालुकाप्रमुख राजू नाठे, दीपक गायधनी संतोष गुप्ता, आदी उपस्थित होते. (Nashik News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT