Nashik Politics: राज्यभर डंका पिटणाऱ्या मंत्र्यांच्याच मतदारसंघात संकटग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत!

Farmers affected by heavy rains in crisis, Minister Bhujbal, Kokate and Bhuse constituency, farmers in trouble due lack of government relief- शासनाच्या तांत्रिक अडचणींमुळे नाशिकच्या मंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकरी मदतीपासून वंचित
Dada Bhuse, Manikrao Kokate & Chhagan Bhujbal
Dada Bhuse, Manikrao Kokate & Chhagan BhujbalSarkarnama
Published on
Updated on

Farmers News: राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने संकटात सापडले आहेत. राज्य शासनाने त्यासाठी पॅकेज जाहीर केले आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी पॅकेजच्या लाभापासून दूरच आहेत.

नाशिक जिल्ह्यात कांदा पीक सतत अडचणीत असते. यंदाच्या अतिवृष्टीने अधिक संकटात असलेल्या कांदा उत्पादकांना दुसरा शॉक बसला आहे. द्राक्षांसह बहुतांशी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मदतीची घोषणा केली होती. त्यासाठी सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर झाले. त्यात अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येत आहे.

Dada Bhuse, Manikrao Kokate & Chhagan Bhujbal
NCP Anil Patil Politics: निवडणुकीतील लक्ष्मी दर्शनावर महायुतीने शोधला रामबाण, अमळनेरमध्ये बिनविरोधचे वारे?

नाशिक जिल्ह्यात मात्र परिस्थिती वेगळीच आहे. फार्मर्स आयडी आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. बहुतांश शेतकरी या मदतीपासून वंचित राहिल्याने असंतोषाचे वातावरण आहे.

Dada Bhuse, Manikrao Kokate & Chhagan Bhujbal
Eknath Khadse Politics: खडसेंच्या घरातील चोरीने कोणत्या मंत्र्याला फायदा? पाटबंधारेच्या १६०० कोटींच्या घोटाळ्याची कागदपत्रांच्या चोरीने संशय!

विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यात चार मंत्री आहेत. यातील बहुतांश मंत्री राज्यभर विविध प्रश्नांवर आवाज उठवतात. राज्याचा कारभार हातात. मात्र त्यांच्या स्वतःच्याच मतदारसंघात परिस्थिती विपरीत आहे.

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शेतकरी त्रस्त आहेत. येथील ६२,७९८ शेतकऱ्यांना निसर्गाचा दणका बसला. यातील अवघ्या ८,४५७ शेतकऱ्यांना मदत मिळाली. ५४,३१४ शेतकरी अद्यापही फार्मर्स आयडी अभावी मदतीपासून वंचित आहेत.

क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या सिन्नर मतदारसंघातही स्थिती वेगळी नाही. येथे १४,७०५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यातील ६,३५९ शेतकऱ्यांना मदत मिळाली, ८,३४६ शेतकरी मदतीपासून वंचित आहेत.

शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव बाह्य मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर शेतकरी शासनाच्या मदतीसाठी टाहो फोडत आहेत. येथील ८७,१११ शेतकऱ्यांवर निसर्गाची अवकृपा झाली. यातील अवघ्या २६,७०३ शेतकऱ्यांना मदत मिळाली. ६०,४०८ शेतकरी तांत्रिक पूर्तता करण्यात कमी पडल्याने मदत मिळाली नाही. एकंदरच राज्यभर ही स्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात तीन लाख ५ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले मात्र आतापर्यंत अवघ्या एक लाख 13 हजार शेतकऱ्यांनाच मदत मिळाली आहे.

राज्याचा नेतृत्व करणाऱ्या मंत्र्यांनाच आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना शासकीय समन्वय निर्माण करून देण्यात यश आलेले नाही. त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसला आहे. पंचनामा झाल्यानंतरही अतिवृष्टी झाल्याने शेतकरी पूर्णतः खचला आहे. आता त्याच्या मार्गात शासकीय मदतीसाठी फार्मर्स आयडीच्या अडथळ्यांची शर्यत आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com