Uddhav Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : गावित, दराडे, धात्रक बाहेर… ठाकरेंना एकामागून एक धक्के ; उत्तर महाराष्ट्रात लागलेली गळती थांबेना

Uddhav Thackeray faces major setbacks as Nirmala Gavit, Narendra Darade, and Ganesh Dhatark exit Shiv Sena before local elections : विधानसभा निवडणुकीनंतर आजवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेषकरुन शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

Ganesh Sonawane

Uddhav Thackeray : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष जोरदार कामाला लागले आहे. महापालिका, जिल्हा परिषद जिंकण्यासाठी नवनवीन डावपेच आखले जात आहेत. असं असताना दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मात्र धक्क्यावर धक्के बसत असून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला गळती सुरु झाली आहे. ही गळती रोखणं उद्धव ठाकरे यांच्यासह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, त्या खासदार संजय राऊत यांच्यासाठी मोठे आव्हान होऊन बसले आहे.

नाशिकमध्ये ठाकरे गटाला बुधवारी मोठा धक्का बसला. माजी आमदार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या निर्मला गावित यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तीन दिवसांपूर्वी माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी देखील पक्षाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटाची वाट धरली. मागच्याच महिन्यात नांदगावमध्येही ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाचे विधानसभेचे उमेदवार गणेश धात्रक यांनी देखील भाजपात प्रवेश केला.

विधानसभा निवडणुकीनंतर आजवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश केला आहे. विशेषकरुन शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात शिंदे सेनेकडून ठाकरेंचा पक्ष खिळखिळा करण्याचे काम सुरु आहे. त्याचा मोठा फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यता आहे.

गळती रोखण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार व सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाने नाशिकमध्ये त्यासाठी मोठ्या शिबीराचे आयोजन केलं होतं. त्यात कार्यकर्त्ये, नेते, पदाधिकारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वत: उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरे पक्षाचे सर्वच पहिल्या फळीतील नेत्यांनी प्रयत्न केले. पंरतु त्याचा काहीही उपयोग झाल्याचे दिसत नाही. ठाकरे गटाला गळती रोखण्यात सर्वांना अपयश आल्याचं स्पष्ट होतं.

राज ठाकरे यांची मनसे व उद्धव ठाकरे यांचा गट एकत्र आल्यास किमान नाशिक महापालिका निवडणुकीत तरी फायदा करुन घेता येऊ शकतो असं राजकीय जाणकाराचं म्हणणं आहे. मात्र त्यांसदर्भातही दोन्ही पक्षात केवळ चर्चा असून अद्याप तसा काही निर्णय झालेला नाही. राज ठाकरे यांच्या नाशिक दौऱ्यात त्यासंदर्भात काही चर्चा होईल असे वाटत असताना मात्र तसे काही झाले नाही. त्यात शहर व जिल्ह्यात ठाकरे गटाला लागलेल्या गळतीमुळे दिवसेंदिवस ठाकरेंच्या पक्षासाठी स्थानिक निवडणुकांचा गड सर करणं अवघड बनत चाललं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT