Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. तसेच काही ठिकाणी तर राडा झाल्याच्या घटनाही उघडकीस आल्या होत्या. याचाच प्रत्यय नाशिक शहरातही आला होता. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलिसांना इशारा दिला होता. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच दम भरला.
विधानसभा निवडणूक प्रचार भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यकर्ता गाडीच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो. कार्यकर्त्यांना दमबाजी होते. प्रचारात अडथळे आणले जातात. पोलीस मात्र बघायची भूमिका घेते. भारतीय जनता पक्षाला अनुकूल ठरेल अशी भूमिका घेते. त्यामुळे त्रस्त कार्यकर्त्यांनी आज जाहीरपणे त्याची तक्रार केली.
सिडको परिसरात शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या मतदान करणाऱ्या कार्यकर्त्यांना आज भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी बेदम मारहाण केली. प्रचार करणाऱ्याला दमबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. याबाबत उमेदवार सुधाकर बडगुजर हे पोलीस ठाण्यात गेले असता, पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्यास नकार दिला. उलट मारहाण झालेल्या कार्यकर्त्याला दमबाजी करण्यात आली, अशी तक्रार उमेदवार बडगुजर यांनी जाहीर सभेत केली.
गुरुवारी पंचवटी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्या भावालाही मतदानाच्या स्लिप वाटताना त्रास देण्यात आला. गाडीवर दगडफेक करण्यात आली. हे समजल्यावर पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांसह थेट पोलीस आयुक्तालयात गेल्या होत्या. यावेळी पोलीस आयुक्तांनी तक्रार करा, असे विधान केले. त्यामुळे निवडणूक प्रचार लोकशाही मार्गाने होत नसल्याचे वातावरण तयार होऊ लागले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या सभेतच याबाबतच्या जाहीर तक्रारी झाल्या. हा संदर्भ लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी पोलीस आयुक्त आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वर्दीचा मान राखावा. भाजपला सहकार्य होईल अशी भूमिका घेऊ नये. तुम्ही सरकारचे नोकर आहात भाजपचे नाही याचे भान ठेवा. हे सरकार आज आहे. दहा दिवसांनी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. मग तुम्हाला आमच्याबरोबर काम करावयाचे आहे, हे लक्षात ठेवा. आमच्या सरकार आल्यावर याची योग्य परतफेड केली जाईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
गेले काही दिवस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर सातत्याने खोट्या तक्रारी दाखल केल्या जात असल्याचे प्रकार घडत आहेत. शिवसेनेचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांना लोकसभा निवडणुकीत तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. पोलिसांच्या या दडपशाहीने सामान्य जनतेत वेगळ्याच संदेश जात आहे. उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्याला अचूक हात घातल्याने पोलीस जनतेचाही नजरेत आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.