Devendra Fadnavis On MVA: फडणवीसांनी भरसभेत ऐकवली 'ती' ऑडिओ क्लिप; 'मविआ'तील पक्षांवर केला गंभीर आरोप

Maharashtra Assemblye Election 2024 : गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने पुण्याचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला आहे. आता अजित पवारही सोबत असून त्यांचे व्हिजनही आपल्यासोबत आहे. त्यामुळे पुण्याचा विकास आता मोठ्या गतीने होणार आहे.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News: विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पुण्यामध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरती निशाणा साधला. पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे या गुजरातच्या राजदूत असल्यासारखं काम करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील महायुतीच्या प्रचारार्थ शुक्रवारी (ता.15) झालेल्या भरसभेत मोबाईलवरती एक ऑडिओ क्लिप उपस्थितांना ऐकवली. ज्यामध्ये हरियाणानंतर महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आल्यास या सरकारला बळ मिळेल आणि केंद्रातील सरकार देखील मजबूत होईल. त्यामुळे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) नेत्यांना मदत करण्याचं यामध्ये आवाहन मुस्लिम मतदारांना करण्यात आल्याची ती व्हिडिओ क्लिप होती.

ही व्हिडिओ क्लिप ऐकवत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या ठिकाणी व्होट जिहाद सुरू असून त्यामुळे आपण सर्वांनी एक राहिले तर आपण सेफ राहू असा नारा त्यांनी पुन्हा एकदा दिला. तसेच राज्यात 2014 ला महायुतीचे सरकार आल्यानंतर पुण्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले. मेट्रोचं काम देखील वेगाने करण्यात आलं, असंही त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
Raj Thackeray : राज ठाकरे सभेसाठी आले पण व्यासपीठावर गेलेच नाही, दोन मिनिटात संपवलं भाषण!

दिल्ली मेट्रोचे काम झालं, तेव्हाच मेट्रो पुण्यातील येणं आवश्यक होतं. मात्र, तत्कालीन सत्ताधाऱ्याने याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या मेट्रो प्रकल्पाला गती दिली.

स्वारगेटमध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मल्टी मॉडेल हब आपण उभारत आहोत. नव्याने मेट्रो मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. खडकवासला ते खराडी देखील मेट्रो प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. चांदणी चौकामध्ये देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक उत्तम नियोजित रस्ते उभारण्यात आले आहे. पुणे रिंग रोडचं टेंडर पास करण्यात आल्या असून लवकरच या रोडचे काम सुरू होणार आहे. यामुळे पुणे शहरातील मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी दूर होणार आहे.

Devendra Fadnavis
Jayant Patil : जयंत पाटलांचा मोहोळच्या जनतेला शब्द; ‘अवघ्या तीन दिवसांत अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करू’

गेल्या काही वर्षांमध्ये सरकारने पुण्याचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न केला आहे. आता अजित पवार देखील आपल्या सोबत असून त्यांचे व्हिजन देखील आपल्यासोबत आहे. त्यामुळे पुण्याचा विकास आता मोठ्या गतीने होणार आहे. आपण पुण्याला मॅन्युफॅक्चरिंग हाफ केल्याचं आहे. टेक्नॉलॉजी हब म्हणून पुण्याला विकसित करायचं आहे. गेल्या काही वर्षांत पुण्यामध्ये परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात आली असून रोजगारांचे प्रमाण देखील वाढला आहे.

गेले काही दिवसांपासून शरद पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे यांनी गुजरात राज्याचं वकील पत्रच घेतलं आहे. गुजरातचे राजदूत म्हणून ते काम करत आहेत. रोज उठून ते सांगतात की, आमचे उद्योग गुजरातला चालले आहेत. त्यामुळे गुजरात सरकारला जाहिरात करण्याची गरजच नाही. कारण शरद पवारसाहेब आणि सुप्रिया सुळे या रोज भोंगा घेऊन सांगत असतात.

फडणवीस म्हणाले, सुप्रिया सुळे यांना सांगू इच्छितो की, 2015 ते 19 या वर्षांमध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. तेव्हा महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये राज्य एक नंबरला होता. 2019 ला जेव्हा दगाफटका होऊन तुमचं सरकार आलं. त्यानंतर महाराष्ट्र पिछाडीवर गेला. मात्र, पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत नंबर वन झाला आहे. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की, जेवढे देशांमध्ये इन्व्हेस्टमेंट आलं आहे. त्यातलं 52% हे एकट्या महाराष्ट्रात आला आहे.

त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचं गुणगान करणं आवश्यक असताना गुजरातचा गुणगान करत आहात. मला वाटलं सुप्रिया सुळे म्हणतील की, मला अभिमान आहे महाराष्ट्र पुढे चालला आहे. राज्यामध्ये 52% इन्व्हेस्टमेंट आली आहे. मात्र, केवळ त्यांना राजकारण करायचा असून त्यांनी गुजरातचं मुखपत्र घेऊन ते काम करत आहेत.

Devendra Fadnavis
Atul Save News : 'ओबीसी' विद्यार्थ्यांसाठी 52 ठिकाणी वसतिगृह सुरू ; पाच हजारांहून अधिक प्रवेश निश्चित!

देवेंद्र फडणवीस म्हणाले ,महाविकास आघाडीतील पक्ष मतांसाठी लांगूलचालन करत आहेत. जातीधर्मांचं ध्रुवीकरण करत आहेत. आम्ही लाडकी बहीण योजना आणली मात्र ती योजना मुस्लिम भगिनींसह सर्व धर्मांच्या भगिनींना लागू केली. मात्र, सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वेगळंच चाललं आहे.

त्यांनी 2012 ते 2024 मध्ये जे काही दंगली झाले आहेत. त्यातील मुस्लिम लोकांवरतीचे गुन्हे दाखल केलेत, ते मागे घेण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच मुस्लिमांना आरक्षण देण्याची देखील मागणी महा विकास आघाडीच्या नेत्यांनी मान्य केली आहे. मतांसाठी हे त्यांचे लांगूलचालन सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com