Shiv Sena Andolan sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shiv Sena News : वादग्रस्त विधान जितेंद्र आव्हाडांचे, टीका ठाकरेंवर... कारण काय?

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव

Nashik: प्रभू श्रीराम मांसाहारी होते, असे विधान राष्ट्रवादीच्या अधिवेशनात जितेंद्र आव्हाड यांनी केले. आपले मत खरे असल्याचे सांगत आता आव्हाड पुरावे देखील देत आहेत. मात्र, आव्हाडांनी केलेल्या विधानानंतर शिवसेनेचे पदाधिकारी (शिंदे गट) थेट उद्धव ठाकरे गटाला टार्गेट करत आहेत.

शिवसेना नेते (शिंदे गट) जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावर आक्रमक झाले आहेत. ठाण्यातील नेत्यांकडून आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले तर, नाशिकमधील शिंदे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. श्रीरामांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडून त्यावर मखलाशी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांच्या मांडीला मांडी लावून ठाकरे गटाचे नेते बसतात. रोज सकाळी प्रवचन देतात. ते आता गप्प का, असा प्रश्न शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता उपस्थित केला.

नाशिकमध्ये शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आव्हाडाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला उलटे लटकावून जोडे मारून आंदोलन केले. अयोध्येत साकारत असलेल्या श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. देशांत धार्मिक वातावरण दुषित करण्याचे काम जितेंद्र आव्हाड करत असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी यावेळी केला.

आंदोलनावेळी शिवसेना नाशिक सहसंपर्क प्रमुख चंद्रकांत लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवसेना विस्तारक योगेश बेलादर, उप जिल्हाप्रमुख शामकुमार साबळे, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख बाबुराव आढाव, रोशन शिंदे, रुपेश पालकर, अंबादास जाधव, दिगंबर नाडे, महिला आघाडी महानगर संघटक अस्मिता देशमाने, सुलोचना मोहिते, शर्मिला जाधव, मंजुषा पवार, सुलोचना जाधव, नितीन साळवे, आनंद फरताळे, उमेश चव्हाण, सुनील भंबारे, आदित्य बोरस्ते आदी उपस्थित होते.

आंदोलनात कापले कान...

यावेळी शिवसेनेच्या आंदोलनकर्त्यांनी पुतळ्याचे नाक कापले. श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर अशी ओळख नाशिकचे आणि श्रीरामांचे वेगळे नाते आहे. नाशिकमध्ये श्री रामाचे अनेक पुरातन मंदिरे आहेत, त्यांचा एक इतिहास आहे. तपोवनात रावणाची बहीण शूर्पणखाचे नाक कापले होते. त्याचमुळे आंदोलनावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला उलटे लटकावून त्याचे नाक कापण्यात आल्याचे बोरस्ते यांनी सांगितले.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT