विधानसभाध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाने फरक पडणार नाही. जनतेला या निर्णयाबाबत सर्व काही माहिती आहे. आम्ही या निर्णयाने निराश झालेलो नाहीत. नाशिकला शिवसेनेचे (ठाकरे गट) अधिवेशन असून ते 'न भूतो न भविष्यती' असे होईल. शेवटी आम्हाला जनतेपर्यंत पोहोचायचे आहे आणि जनतेला सर्व काही माहीत आहे, असा टोला Uddhav Thackeray गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी लगावला.
शिवसेना एकनाथ शिंदेच्या गटाची, असा निर्णय विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्याचे वेगवेगळे पडसाद राज्यभरात पडताना दिसत आहेत. पण शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात मात्र काहीसा थंडपणा निर्माण झाला आहे, असा आरोप होतोय. हा आरोप बडगुजर यांनी फेटाळून लावला.
विधानसभाध्यक्षांच्या निकालाने काही फरक पडणार नाही. आमचे काम जनतेसाठी सुरू आहे. जनतेच्या न्यायालयातच निकाल लागणार आहे. जनताच याचा फैसला करेल. सध्या आम्ही पक्षाच्या अधिवेशनाची तयारी करण्यात गुंतलो आहोत. हे अधिवेशन 'न भूतो न भविष्यती' ठरणार असल्याचा दावा बडगुजर यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाचे 1995 मध्ये अधिवेशन झाले होते. त्यानंतर आता हे अधिवेशन होत आहे. कार्यकर्त्यांना निकालाची आणि राजकारणाची जाणीव आहे. त्यामुळे या घटनांचा मोठा फरक पडणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकच्या दौऱ्यादरम्यान काळाराम मंदिरात दर्शन घेणार आहे. त्यांच्या हस्ते गोदाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आणि पक्षाच्या अधिवेशनाने शिवसेना ठाकरे गट नाशिकमधून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. 1995 च्या अधिवेशनानंतर युतीचा भगवा विधानसभेवर फडकला होता. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोणती दिशा मिळेल, हे लवकरच स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.