Nashik Kalaram Mandir : देशात अयोध्या, तर महाराष्ट्रात 'काळाराम' केंद्रस्थानी

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी घेणार नाशिकमधील काळारामाचे दर्शन, नवीन वर्षात काळारामाच्या दर्शनाला व्हीआयपींची रांग...
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

अरविंद जाधव

Nashik Kalaram News :

नवीन वर्ष उजाडल्यापासूनच नाशिकमधील (Nashik) काळाराम मंदिरात व्हीआयपींची दर्शनासाठी रीघ लागली आहे. आता 12 जानेवारीला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) दर्शन घेणार आहेत. त्यामुळे देशात चर्चा अयोध्येतील (Ayodhya) रामाची आणि महाराष्ट्रात चर्चा होतेय ती नाशिकमधील काळारामाची!

गेल्या आठवड्यात राज्यपाल रमेश बैस यांनी काळारामाचे दर्शन घेतले. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाजपच्या आमदारांच्या फौजफाट्यासह काळारामचे दर्शन घेतले. आता शुक्रवारी (12 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमासाठी येणार आहेत. तत्पूर्वी ते काळारामाचे दर्शन घेणार आहेत.

Narendra Modi
Nashik Youth Festival : युवकांसाठी खुद्द पंतप्रधान येणार नाशिकमध्ये

पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये गोदाआरतीही करतील, तर 22 जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील काळारामाचे दर्शन घेऊन गोदाआरती करणार आहेत.

पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने सुरक्षाव्यवस्था कडक केली जात आहे. विशेष सुरक्षा दलाने (एसपीजी) रामकुंडासह काळाराम मंदिराच्या परिसराची पाहणी केली. एसपीजीच्या पाहणीबरोबरच येथील अतिक्रमणे प्रशासनाने काढून टाकली आहेत.

27 व्या राष्ट्रीय युवक महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. औरंगाबादरोड हायवेवर रोड शो आणि त्यानंतर उद्घाटन कार्यक्रम करून मोदी मुंबईला रवाना होतील, असा ढोबळ कार्यक्रम सुरुवातीस आखला गेला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी गोदाआरतीसह काळाराम मंदिरात दर्शनासाठी पंतप्रधानांनी यावे, असा आग्रह धरला. हा आग्रह पंतप्रधानांनी मान्य केला. त्यामुळे शुक्रवारी मोदी रोडशोनंतर थेट रामकुंडावर दाखल होतील. गोदाआरतीसाठी ते 10 मिनिटे थांबतील. त्यानंतर लगेचच काळाराम मंदिरात पोहोचतील. तिथे 25 मिनिटांमध्ये आरती व पूजा करून ते तपोवनातील कार्यक्रमस्थळी पोहोचतील. दरम्यान, रामकुंड परिसरातील इमारतींवर चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी रामायणातील वेगवेगळी चित्रे साकारत आहेत.

(Edited by Avinash Chandane)

R...

Narendra Modi
Shrikant Shinde : 'राम मंदिर झाले आता मुख्यमंत्री मलंगगडालाही मुक्ती देतील...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com