Uddhav Thackeray-Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena Dasara Melava : ठाकरे की शिंदे? शिवाजी पार्कचा फैसला झाला ; दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडून कुणाला परवानगी?

Shivsena Dasara Melava 2026 : 20 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला होता. अखेर महापालिकेने निर्णय घेतला.

Ganesh Sonawane

Uddhav Thackeray Shiv Sena Gets Shivaji Park Permission : शिवसेनेच्या स्थापनेपासून दादर येथील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर (शिवाजी पार्कवर) दसरा मेळावा घेण्याची प्रदीर्घ परंपरा आहे. शिवसेना व दसरा मेळावा हे एक अतूट नाते आहे. मात्र, शिवसेना फुटीनंतर शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळाव्यावरून मोठा राजकीय हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता.

यापूर्वी शिंदे व ठाकरे अशा दोन्ही गटांकडून मैदानावर दावा सांगण्यात आला होता. त्यामुळे वाद न्यायालयापर्यंत गेला होता. तसेच इतर काही संघटनाही अर्ज करत असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापत असे. त्यामुळे परवानगी कुणाला मिळणार यावरुन चढाओढ रंगत असे.

मात्र, यंदा कोणताही राजकीय वाद किंवा कलगीतुरा न रंगता शांततेत आणि थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ही परवानगी मिळाली आहे. यंदाच्या पारंपरिक दसरा मेळाव्यासाठी महापालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने ठाकरेंच्या सेनेला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे.  

या मंजुरीमुळे येत्या २० ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा मेळावा होणार असून ठाकरेंचीच डरकाळी ऐकायला मिळणार आहे.  यंदा होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे या दसरा मेळाव्यात काय बोलतात, हे पाहणं महत्वाचं असेल. दरम्यान त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या सेनेचा मेळावा आता कुठे होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन महिन्यांपूर्वीच परवानगी

यंदाच्या मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने दोन महिन्यांपूर्वीच महापालिकेच्या जी-उत्तर विभागाकडे रीतसर अर्ज दाखल केला होता. विशेष म्हणजे, यंदा या मैदानासाठी ठाकरेंच्या सेने व्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा अर्ज आला नसल्याने ठाकरेंच्या सेनेचा मार्ग मोकळा होऊन महापालिकेने तत्काळ ही मंजुरी दिली आहे.

मेळाव्याची सुरुवात

३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतील दादर येथील शिवाजी (शिवतीर्थ) येथे पहिल्या दसरा मेळाव्याची सुरुवात केली. या मेळाव्यातून आगामी राजकीय दिशा, पक्षाची भूमिका आणि धोरणे ठरवली जातात. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून चालत आलेली ही परंपरा आजही पक्षनेत्यांकडून पाळली जाते. शिवसेनेचे दोन गट पडले असले तरी दोन्ही गटाकडून हा मेळावा साजरा केला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT