Dhule News : राज्यात भाजपनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद अधिक आहे. विशेषतः राज्यात महायुतीमध्ये सर्वाधिक 13 खासदार शिवसेनेचे आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून राज्यभरात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला जात आहे. त्यातच उद्योगमंत्री उद्या सामंत शुक्रवारी धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी धुळे येथील कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधील नाराजी व गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. यावरून मंत्री उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच यावेळी उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचे कान टोचतानाच थेट इशारा दिला आहे.
एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात आज फक्त एकच आमदार आहे आणि आपणच दुसऱ्यांना संधी देत आहोत. नंदुरबारमध्ये 2 हजार पदाधिकारी, धुळ्यात मात्र ५० कार्यकर्तेही आणता आले नाहीत, आपण साहेबांना फसवतोय का? याचे पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे, असे यावेळी सामंत यांनी सुनावले.
यावेळी मंत्री सामंत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काही सूचना देखील केल्या. आपला मित्र पक्ष काय करतो, यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याकडे लक्ष द्या? गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा, असे उदय सांमत यांनी स्पष्ट केले आहे. त्यासोबतच आता ही शेवटची संधी आहे, असा इशारा देखील यावेळी उदय सामंत यांनी दिला.
महाराष्ट्रात पक्षाच्या सर्वाधिक तक्रारी या धुळ्यातून आहेत. ‘चांगलं काम करा, ही तुम्हाला शेवटची संधी आहे, अन्यथा धुळ्यात नवीन प्रयोग करून नवीन टीम उभी करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेनेचे चार सदस्य डीपीसीमध्ये आणि विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे असायला पाहिजे, मनोज मोरे आणि सतीश महाले यांनी एकत्र येऊन संघटनेचे काम करावे. कार्यकर्ते आहेत म्हणून आपण आहोत, साहेबांसोबत कार्यकर्त्यांचे फोटो काढा. संपूर्ण हॉल शिवसैनिकांनी भरला तरच पक्षाची खरी ताकद दिसेल एकनाथ शिंदेंमुळेच तुमचे अस्तित्व आहे. कार्यकर्त्यांना तुमच्या राजकारणात भरडू नका, शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील वाद थांबवा, संघटना मजबूत करा, असे यावेळी सामंत यांनी म्हटले आहे.
यावेळी सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे. मित्रपक्ष काय करतो यापेक्षा शिवसेनेत काय चाललंय याकडे लक्ष द्या, गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा व्यासपीठावरील पदाधिकाऱ्यांना ही शेवटची संधी आहे, असा इशाराच यावेळी उदय सामंत यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.