पंतप्रधान नरेंद्र मोदी देश आणि गुजरात याच्यामध्ये एक भिंत उभी करीत आहेत. देश के लिए 'मन की बात' आणि गुजरात के लिए 'धन की बात' हे मोदी यांचे धोरण आम्ही सहन करणार नाही, असा थेट इशारा शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल दिला.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे काल नाशिकमध्ये (Nashik) राज्य अधिवेशन झाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी केंद्रातील भाजप (BJP) सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून महाराष्ट्रावर होणारा अन्याय आणि गुजरातला पळवल्या जाणाऱ्या प्रकल्पांविषयी अतिशय आक्रमक टीका केली.
'छत्रपती शिवाजीमहाराजांनी (Chhatrapati ShivajiMaharaj) सुरत (Surat) लुटली होती, तेव्हा ती गुजरातची म्हणून नव्हे, तर तिथे इंग्रजांची वखार होती म्हणून ती लुटली होती. इंग्रजांची वखार सुरतला होती म्हणून सुरत लुटली. मात्र, मोदीजी हे आमचा महाराष्ट्र लुटत आहेत. अक्षरशः ओरबाडत आहेत. तुम्ही गुजरातला समृद्ध करा आम्हाला आनंद होईल. मात्र, जे आमच्या महाराष्ट्राचे हक्काचे वैभव आहे, ते तुम्ही ओरबाडता आहात. ते आम्ही ओरबाडू देणार नाही. त्यासाठी आज आम्ही तुमच्यासमोर लढायला उभे आहोत,' असा इशारा उद्धव ठाकरेंनी या सभेतून दिला.
यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीकेची तोफ डागली. 'हे मिंधे म्हणतात, आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडला. अरे मिंध्या, तुझ्या डोळ्यासमोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय. तू शेपूट हलवत दिल्लीची चाकरी करतो आहेस. खुर्चीसाठी दिल्लीसमोर शेपूट हलवत बसतो. हे बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि हिंदूत्व आहे का? हे बाळासाहेबांनी शिकवलं आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पंतप्रधान सिंधुदुर्गला गेले तेव्हा कोकणवासीयांना वाटले, आता कोकणाला काहीतरी मिळेल. पण कसले काय, मोदीजी आले आणि सिंधुदुर्गचा पाणबुडी प्रकल्पच गुजरातला घेऊन गेले, असा आरोप उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केला.
जे जे महाराष्ट्राचे वैभव आहे, महत्त्वाच्या संस्था आहेत, त्या गुजरातला हलवल्या जात आहेत. या आरोपाचा ठाकरेंनी पुनरुच्चार केला. त्यामुळे महाराष्ट्र आणि भाजप यांच्यातील राजकारणाला अधिक टोकदार करण्याचा प्रयत्न पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या सभेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.