Thackeray Attack On BJP : उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मुळावरच घाव घातला; ‘श्यामाप्रसाद मुखर्जींचा दाखला देत...’

Nashik Shivsena News : नाशकात उद्धव ठाकरे यांनी ठाकरीशैलीत भाजपला शालजोडे हाणले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News : स्वातंत्र्यलढ्यात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीगबरोबर सरकार स्थापन केले होते. श्यामाप्रसाद मुखर्जी तुमचे बाप आहेत. त्यावर काही बोलाल का? जय श्रीराम फक्त बोलू नका, तशी वागणूक ठेवा, अशी सणसणीत चपराक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला लगावली. (Uddhav Thackeray's bitter criticism of BJP)

शिवसेना आणि भाजपचे राजकीय वैर निर्माण झाले आणि ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सत्ता स्थापन केली. तेव्हापासून भाजपकडून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले जात आहे. बाळासाहेबांचे विचार, हिंदूत्व आदी मुद्द्यावरून त्यांनी फारकत घेतल्याचा आरोप सत्ताधारी भाजपसह शिवसेनेकडून (शिंदे गट) होतो. याचा समाचार घेताना उद्धव ठाकरे यांनी ठाकरी शैलीत भाजपला शालजोडे हाणले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेबांनी, गिरणी कामगाराच्या मुलाला उमेदवारी दिली अन् मंत्रीही केलं...

श्यामाप्रसाद मुखर्जी भाजपचे आराध्य मानले जातात. कडवट हिंदूत्ववादी अशी ओळख असलेल्या मुखर्जी यांनी स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिम लीगबरोबर युती केली होती. श्यामाप्रसाद मुखर्जी तुमचे बाप आहेत, तर त्यावर बोला असा घणाघात ठाकरे यांनी केला. भाजपच्या हिंदूत्वाच्या मुद्द्याची, पक्षाच्या विचारांची वाताहत झाली अन् ते पाहून लाज वाटत असल्याची टीकाही ठाकरे यांनी केली.

भाजपने इंग्रजांची नीती चालवली आहे. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जेव्हा मुस्लिम लीगबरोबर गेले, त्यावेळी महात्मा गांधी यांनी चले जाव मोहीम सुरू केली होती, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले. भाजपचा हाच बुरखा फाडला पाहिजे. त्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. ठाकरे यांनी भाजपच्या मुळावर घाव केला असून, त्यास भाजपचे थिंक टँक कसे उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Bal Thackeray Birth Anniversary: बाळासाहेबांनी सांगितले अन् साबीर शेख मंत्री झाले !

भाजपबरोबर ३० वर्षे होतो, पण निर्लज्ज झालो नाही...

आता आम्ही काँग्रेससोबत असल्याचा आक्षेप घेतला जातो. मात्र, भाजपबरोबर ३० वर्षे युतीत होतो. त्यामुळे आम्ही निर्लज्ज झालो नाहीत, असे स्पष्ट करीत ठाकरे यांनी भाजपवर तोफ डागली. इतिहास उकरून काय होणार आहे. भविष्य घडवायला शिका, हे आदित्य म्हणाला ते बरोबर आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.

Edited By : Vijay Dudhale

R...

Uddhav Thackeray
Balasaheb Thackeray Birth Anniversary : ‘ती’ निवडणूक जिंकताच बाळासाहेबांनी कौतुक केले अन्‌ माँसाहेबांनी जेवायला तीन हजार दिले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com