Uddhav Thackeray :  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackeray : जळगावात ठाकरेंची खडसेंसाठी बॅटींग; "शिवसेनेला तोडायचं काम नाथाभाऊंच्या गळ्यात पण.. "

Jalgaon News : "म्हणजे पक्षात डोईजड झाले की, वेगवेगळे आरोप करून पक्षातून काढून टाकायचं.."

सरकारनामा ब्यूरो

Uddhav THackeray : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री व ठाकरे गट प्रमुथ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावेळेस त्यांनी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबत अन्याय झाल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, "२०१४ साली शिवसेना भाजप युती तुटली. एके दिवशी मला फोन नाथाभाऊंचा आला म्हणाले की, आपली युती तुटली.तेव्हा भाजपने हे काम नाथाभाऊंच्या गळ्यात टाकंल होतं की शिवसेनेला तोडा. आता नाथाभाऊंनाच त्रास देवून, भाजपमधून बाहेर काढलं. म्हणजे पक्षात डोईजड झाले की, वेगवेगळे आरोप करून पक्षातून काढून टाकायचं आणि इतर पक्षातील भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घ्यायचं, ही भाजपची नीती, अशा शब्दात ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

माझे वडील चोरतात, पण तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमचे आशिर्वाद माझ्यासोबत आहे. आव्हान भाषा आम्हालाही येते. पण आमच्यापुढे भाजपचं आव्हान बिल्कुल नाही. भाजप सत्तेत असल्यामुळे देशाचं जे नुकसान होत आहे. या नुकसानीचं आव्हान माझ्यासमोर आहे, असे ठाकरे म्हणाले.

एका कापूस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केली. लोकसंख्येच्या बाबतीत नंबर एक पण आत्महत्या करत असतील तर लोकसंख्येचं करायचं काय? नुसती धूळफेक चालू आहे. महागाई कमी झालं? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं का? य़ा थापा एकत आले. पण निवडणुका आल्या की पुन्हा अब की बार याचं सुरू होतं. पण अब की बार आपटा यांना, असे ठाकरे म्हणाले.

सत्यपाल मलिक यांनी सरकारला माहिती दिली. मात्र त्यांच्यामागे सीबीआय लावले. अमित शहा यांना विचारायचं आहे सीमेवर जवान शहीद होतात, पण तुम्हाला कर्नाटक निवडणुकीची चिंता लागलीये. आमच्यामागे इडी साीबीआय लावता, धाडी टाकता, मात्र हेच तुमच्याकडे आले की शुद्ध आणि आमच्याकडे असले की भ्रष्ट. यांना भाजप शिवाय केणताही पक्ष जिवंत ठेवायचा नाही, असेही ठाकरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT