Jalgaon News : गुलाबराव पाटलांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं; जळगावात राजकारण तापलं!

Gulabrao Patil : उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वीच जळगावात राजकारण तापलं
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Politics : जळगावमधील पाचोऱ्यात आज (दि.२३ एप्रिल) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जाहीर सभा होत आहे. मात्र, या सभेपूर्वीच शिवसेना (शिंदे गट) आणि ठाकरे गटामध्ये चांगलच राजकारण तापलं आहे.

''संजय राऊतांनी चौकटीत बोलावं अन्यथा सभेत घुसणार'', असा इशारा गुलाबराव पाटलांनी दिला होता. त्यानंतर संजय राऊतांनीही त्यांना चॅलेंज देत सभेत घुसून दाखवा, असं म्हटलं होतं. यानंतर आता शिवसेनेचे (शिंदे गट) शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेत.

Gulabrao Patil
Gulabrao Patil 400 crore scam: राजकारण तापलं! 'गुलाबराव पाटलांनी कोरोना काळात ४०० कोटींचा घोटाळा केला; राऊतांचा गंभीर आरोप

शेकडो शिवसैनिकांनी गुलाबराव पाटलांचे मुखवटे चेहऱ्यांवर घालत ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणी निघाले असता पोलिसांनी त्यांना जळगावातील शिरसोली येथे रोखलं. यावेळी कार्यकर्यांनी मोठी घोषणाबाजी केली. त्यामुळे येथे काही वेळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

Gulabrao Patil
Bharat Gogawale On Ajit Pawar:''अजित पवार मुख्यमंत्री होणं शक्य नाही,कारण...''; शिंदे गटाच्या गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, जळगावच्या पाचोऱ्यामध्ये ठाकरेंची जाहीर सभा होत आहे. मात्र, सभेआधी जळगावमधील राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे या सभेत काय बोलणार? याकडे सर्वांचे सक्ष लागले आहे.

(Ediited By Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.