Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena News : ...म्हणून उद्धव ठाकरेंच्या सभेला गर्दी होते पण मते मिळत नाहीत; शिवसेनेच्या नेत्याने सांगितलं कारण

Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Leader Ravindra Mirlekar : "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. अशीच गर्दी सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना सुद्धा होते. पण सभांना जेवढी गर्दी होते, त्या प्रमाणात उमेदवाराला मते मिळत नाहीत."

Sampat Devgire

Shivsena News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला राज्यातील जनतेची सहानुभूती आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला, असा दावा शिवसेना (Shivsena) नेते रवींद्र मिर्लेकर यांनी केला.

धुळे (Dhule) शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी शहरात बैठक झाली. शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर तपशील जाणून घेतला. या दोन्ही मतदारसंघांमध्ये येत्या निवडणुकीत शिवसेनेला मोठे यश मिळेल, असं काम करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीत मिर्लेकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी होत होती. अशीच गर्दी सध्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभांना सुद्धा होते. सभांना जेवढी गर्दी होते, त्या प्रमाणात उमेदवाराला मते मिळत नाहीत, असं का होतं? याचा विचार तुम्ही कधी करता की नाही? या गर्दीचा अभ्यास केला पाहिजे.

शिवाय मतदान न होण्याला मुख्य कारण आहे ते म्हणजे, पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी आणि परस्परांतील स्पर्धा. ही गटबाजी आता लगेचच गाडून टाका. अन्यथा त्याची झळ येत्या निवडणुकीत शिवसेना पक्षाला बसेल. ते कोणत्याही स्थितीत परवडण्यासारखे नाही.

ते म्हणाले, शिवसेना (Shivsena) प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी असे म्हणत असत की, माझ्या सभांना गर्दी होते. मग मते का मिळत नाहीत? ही मते जातात कुठे? तर शिवसेना पदाधिकारी अतिशय निष्ठेने काम करतात. मात्र, त्यांच्यात एकीचा अभाव असतो. त्यामुळे गर्दीचे रूपांतर मतांमध्ये होत नाही.

आगामी निवडणुका आपल्याला स्वबळावर जिंकायच्या आहेत. कोणाच्याही कुबड्या घेण्याची गरज पडता कामा नये. त्यासाठी शिवसेनेने झोकून देऊन काम करावे. मतदार आपल्याबरोबर आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराला भरघोस मते मिळतील यात शंका नाही.

या मेळाव्याला शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख माजी आमदार शरद पाटील, सहसंपर्क प्रमुख हिरालाल माळी, माजी नगराध्यक्ष महेश मिस्त्री, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुसे, सुनील पाटील, विजय सुळे, सुरेश राणे, राजू पवार, रवींद्र धनवटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT