Rutuja Latake & Mayor Jayshree Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

निष्ठावंत ऋतुजा लटके यांच्या मागे उद्धव ठाकरेंचे बळ!

महापौर जयश्री महाजन म्हणतात शिवसेना कार्यकर्त्यांना मिळाले बळ.

Sampat Devgire

जळगाव : निष्ठावान (Shivsena Loyal) कार्यकर्त्यांच्या पाठीमागे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांनी आपली सगळी शक्ती पणाला लावून बळ दिले. त्यामुळेच अंधेरी (Andheri East Constituency) विधानसभेच्या निवडणुकीत श्रीमती ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांच्या बिनविरोध निवडीचे चित्र महाराष्ट्रासमोर आले, अशा शब्दांत जळगावच्या महापौर जयश्री महाजन (Mayor Jayshree Mahajan) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. (Mayor Jayshree Mahajan have confidence on Shivsena leader Uddhav Thackray)

महापौर महाजन म्हणाल्या, की अंधेरी विधानसभेचे शिवसेना नेते दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनाने या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती.

यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार म्हणून (कै.) रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचे नाव जाहीर करत त्यांना निवडून आणण्याचा निर्धार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिनविरोध निवडीबाबत महाराष्ट्र संस्कृतीच्या वारशाची आठवण करून देत अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी याबाबत मनोगत व्यक्त केले होते.

उद्धव ठाकरे यांनीही शिवसेना कुटुंब आपले सदैव आभारी राहील, अशी प्रतिक्रिया त्यावर दिली होती, तर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आपले दिशादर्शक विचार व्यक्त केले. सगळ्याच पक्षांनी बिनविरोध निवडीवर सहमती दिल्याने शिवसेनेच्या ऋतुजा लटके यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला. ही बाब निश्चिततच शिवसेनेला बळ देणारी आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT