Chhagan Bhujbal & Uddhav Thackrey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackrey politics: उद्धव ठाकरे समर्थकांचे येवल्यासाठी एकाचवेळी शरद पवार आणि भुजबळ दोघांना आव्हान

Uddhav Thackrey Politics, Shivsena UBT prepared to fight against minister Chhagan Bhujbal in yeola-शिवसेना ठाकरे गट म्हणतो, येवल्यातून यंदा छगन भुजबळ यांच्या विरोधात आम्हीच लढणार

Sampat Devgire

Shivsena UBT News: विधानसभा निवडणूक जवळ आल्याची जाणीव येवला मतदारसंघात जाणवू लागली आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या या मतदार संघात जागा वाटपावरून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्यात चर्चेतील मतदार संघ म्हणून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदार संघाचा उल्लेख केला जातो. सध्या महायुती अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात श्री भुजबळ आहेत. त्यामुळे महायुतीकडून हा मतदार संघ त्यांना सोडण्यात येईल, हे स्पष्ट संकेत आहेत.

महाविकास आघाडीमध्ये मात्र भुजबळ यांना आव्हान देण्यासाठी एकोप्याने उमेदवार देण्याचा निर्णय यापूर्वी झाला होता. दोन दिवसापूर्वी अचानक स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसले. शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीत नाशिकमधील जागा वाटपाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी येवला मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटालाच मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह धरण्यात आला. तालुकाप्रमुख शिवा सुरोसे आणि जिल्हाप्रमुख कुणाल दराडे यांनी उमेदवारीची मागणी केली. या दोन्ही उमेदवारांशी पक्ष निरीक्षक मिर्लेकर यांनी चर्चा केली.

येवला मतदार संघावर यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने आपला दावा केला आहे. या पक्षाकडे विविध इच्छुक आहेत. सध्या भारतीय जनता पक्षात असलेल्या आर्की. अमृता पवार यांनी देखील नुकत्याच झालेल्या शरद पवार यांच्या दौऱ्यात हजेरी लावली.

गेल्या निवडणुकीत याच पक्षाचा उमेदवार म्हणून भुजबळ विजयी झाले होते. मात्र गेली अनेक वर्ष या मतदारसंघात प्रारंभी काँग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी शिवसेना लढत देत आली आहे. १९९५ ते २००४ या कालावधीत कल्याणराव पाटील हे येथील शिवसेनेचे आमदार होते.

त्यानंतरच्या निवडणुकीत श्री भुजबळ हे शरद पवार यांच्या पाठिंब्याने या मतदारसंघाचे आमदार झाले. २००५ पासून आजवर शिवसेनेला या मतदार संघात पन्नास हजार मते मिळत आली आहेत. २०१४ आणि २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला सत्तर हजार मते मिळाली आहेत.

सध्याचे राजकारण मराठा आरक्षण आंदोलन विरुद्ध ओबीसी असे आहे. त्यात श्री भुजबळ यांनी जोरदार तयारी केली आहे. मराठा आरक्षणाचे आंदोलक देखील आक्रमक आहेत. अशा स्थितीत महाविकास आघाडी त्यांना कशी टक्कर देते, याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT