Gulabrao Patil : भाजप आमदारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनी मंत्री गुलाबराव पाटील निरुत्तर!

Mangesh Chavan on Gulabrao Patil : एरव्ही विरोधकांना राजकीय हल्ले करून निवृत्त करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचा नावलौकिक आहे. मात्र गुरुवारी स्वतःच्या जळगाव जिल्ह्यात आणि स्वतःच्याच खात्यातील आरोपांनी ते अडचणीत आले.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil News : राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील गुरुवारी चांगलेच अडचणीत सापडले त्यांना विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले थेट गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने पाटील बचावात्मक झाले होते.

एरव्ही विरोधकांना राजकीय हल्ले करून निवृत्त करण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील यांचा नावलौकिक आहे. मात्र गुरुवारी स्वतःच्या जळगाव जिल्ह्यात आणि स्वतःच्याच खात्यातील आरोपांनी ते अडचणीत आले. हे आरोप विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी पक्षाच्या आणि भाजपच्या आमदारांनीच केले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलेल्या शाब्दिक हल्ल्यांनी मंत्री पाटील अडचणीत आले. हे सर्व आरोप पाटील यांच्या जिल्हा असलेल्या जळगाव जिल्ह्यातीलच होते. आरोप झाले ते पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांवर यामध्ये अधिकार्‍यांनी प्रचंड घोटाळे केल्याचा आरोप झाला.

या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी केली. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची ही बैठक चांगलीच गाजली. अध्यक्ष असलेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांना आमदारांचे समाधान करता येईना.

सत्ताधारी आमदाराने नियोजन मंडळच्या बैठकीचे अध्यक्ष मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद वाढतच चालला होता. तेव्हा राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन त्यांच्या मदतीला धावून आले. त्यानंतरही भाजपच्या आमदारांचे समाधान झाले नाही.

भाजपचे आमदार प्रश्न करीतच राहिले. त्यामुळे अधिकारीही चांगलेच तणावाखाली आले होते. जळगाव जिल्ह्यात बाराशे कोटींची पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत. ही कामे गतवर्षी पूर्ण होणे अपेक्षित होते.

Gulabrao Patil
Balasaheb Thorat Politics: काँग्रेसचा मोठा डाव, सिन्नरमधून बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी?

विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) तोंडावर आहेत. मात्र योजना मंजूर झालेल्या गावांमध्ये पाण्याचा थेंबही मिळत नाही. अशी आक्रमक तक्रार आमदार चव्हाण आणि किशोर पाटील यांनी केली. अद्यापही ती कामे पूर्ण झालेली नाहीत. या कामांवर केवळ २०० कोटींचा खर्च झालेला आहे. अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांना हाताशी धरून हे घोटाळे केले आहेत. त्यामुळे या सर्व घोटाळ्यांची चौकशी करावी.

संबंधित अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी. त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी. हा सर्व वाद सुरू असताना मंत्री पाटील मात्र आमदारांना आपापल्या मतदारसंघात लक्ष घालावे. या कामांचा आढावा घेण्यात येईल, असे सांगत राहिले. ग्रामविकास मंत्री महाजन यांनी संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेऊन आमदारांच्या तक्रारी दूर करण्यात येतील. अशी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला.

Gulabrao Patil
Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटील यांच्या चाचपणीने अजित पवारांच्या आमदारांची धाकधूक वाढली

एकंदरच विरोधकांवर तिखट हल्ले करण्यासाठी गुलाबराव पाटील प्रसिद्ध आहेत मात्र काल त्यांना घरच्यांनीच मोठा आहेर दिला. त्यामुळे याला उत्तर देताना मंत्री पाटील अक्षरशः बचावात्मक झाले होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार चिमणराव पाटील, चंद्रकांत पाटील, शिरीष चौधरी, लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांसह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com