Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena UBT Politics: उद्धव ठाकरे यांचे आघाडीचे संकेत महापालिका निवडणुकीत कोणाची अडचण वाढवणार?

Uddhav Thackrey says Mahavikas Aghadi intact, Shivsena, MNS allready active for elections, benifit to Congress-नाशिक शहरात उद्धव ठाकरे यांच्या घोषणेआधीच शिवसेना आणि मनसेची महापालिका निवडणुकीसाठी एकजुटीने तयारी सुरू

Sampat Devgire

Shivsena, MNS News: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा नारा दिला आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारणात नवे तरंग उमटण्याची शक्यता आहे. यामध्ये महायुतीतील कोणत्या नेत्याची अडचण वाढणार? हा चर्चेचा विषय आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे शहरात पुन्हा एकदा महाविकास आघाडी एकत्र येणार असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजपची अडचण आणि डोकेदुखी वाढू शकते. भाजप निवडणुकीसाठी आपल्या रणनितीत बदल करेल काय? याची चर्चा आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा करण्याआधीच नाशिकसह विविध शहरात शिवसेना ठाकरे पक्ष आणि राज ठाकरे यांची मनसे एकत्र काम करीत आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र निवडणुकांना सामोरे जाण्याची मानसिकता लपून राहिलेली नाही. त्यामुळे भाजपच्या निवडणुक आडाख्यांवर त्याचा परिणाम होणार आहे.

उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकांसाठीही महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे महायुतीत मोठा भाऊ असलेला भाजप सहकारी पक्षांना जागांमध्ये किती वाटा देणार, हे गणित नव्याने मांडण्याची शक्यता आहे.

आगामी महापालिका निवडणुकांसाठी भाजपने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मुख्य टार्गेट केले आहे. दृष्टीने हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजप उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. त्यादृष्टीने शिवसेना ठाकरे पक्षासाठी आगामी निवडणुक प्रतिष्ठेची आहे.

नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात देखील दोन्ही शिवसेना एकमेकांवर तुटून पडल्याचे दिसून आले. त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना ठाकरे पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना फोडण्यासाठी आपली शक्ती पणाला लावत आहेत. त्यामुळे शिवसेनेने महाविकास आघाडीचा पर्याय रेटल्याची चर्चा आहे.

शिवसेना आणि महाविकास आघाडी एकत्र आल्यास भाजपलाही आपल्या निवडणूक रणनीतीत बदल करावा लागण्याची शक्यता आहे. सध्या महायुतीत भाजप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना बरोबर घेणार की नाही याविषयी साशंकता आहे. उद्धव ठाकरे यांच्या नव्या खेळीने शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या स्वबळाच्या तयारीला खीळ बसू शकतो.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT