Shivsena UBT News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. संदर्भात प्रत्येक जिल्ह्यासाठी उपनेते आणि संपर्कप्रमुखांवर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांची चर्चा करून निवडणूक तयारीला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या.
धुळे जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला विशेष परिश्रम करावे लागणार आहेत. विशेषता बहुतांशी ठिकाणी शिवसेनेची भाजप आणि काँग्रेसशी स्पर्धा आहे. त्या पार्श्वभूमीवर उपनेत्या शुभांगी पाटील, अद्वय हिरे आणि जिल्ह्याचे संपर्क नेते माजी आमदार अशोक धात्रक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या.
मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पक्षनेते संजय राऊत, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, अनिल परब आधी नेत्यांचे उपस्थितीत बैठक झाली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. निवडणुकीत पक्षाला प्रभावी कामगिरी करण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेत्यांमध्ये समन्वयाची गरज आहे. त्यासाठी लवकरात लवकर तयारी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
धुळे जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनेक पदाधिकारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात गेले आहेत. पार्श्वभूमीवर त्रिसदस्य समिती नियुक्त करण्यात आली आहे. हे तिन्ही पदाधिकारी स्थानिक कार्यकर्त्यांची चर्चा करून प्रबळ आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशील असतील.
धुळे महापालिका निवडणुक शिवसेना उद्धव ठाकरे पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. धुळे महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता होती. गेल्या पाच वर्षात भाजपने शहराच्या कोणत्याही समस्या सोडविलेल्या नाहीत. शहराला आजही पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रासले आहे. केंद्रात राज्यात आणि महापालिकेत सत्ता असू नये भाजपने धुळे शहराचा हा महत्त्वाचा प्रश्न सोडविला नसल्याने जनतेत नाराजी आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना कार्यकर्त्यांनी गेल्या पाच वर्षात धुळे शहराच्या अनेक प्रश्नांवर आंदोलन करून सत्ताधारी भाजपला अडचणीत आणण्याचे कोणतीही संधी सोडली नाही. महापालिकेतील विविध निविदा आणि विशेषतः कचरा उचलण्याच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. शहराच्या विविध भागात कचऱ्याचा प्रश्न त्यामुळेच तीव्र बनला होता.
निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यासंदर्भात नव्याने बांधणी करून कशाप्रकारे रणनीती आखतो याला विशेष महत्त्व आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे शहरात प्रत्येक प्रभागात उमेदवार निश्चित करणे, नव्या चेहऱ्यांना संधी देणे याबाबत नियुक्त केलेले उपनेते श्रीमती पाटील, अद्वय हिरे आणि माजी आमदार धात्रक हे यशस्वी होतील असा विश्वास या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.