Vilas shinde & Mama Rajwade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Uddhav Thackrey politics: सभापती केले, गटनेता, शहराचे नेतृत्व अन् विधानसभेची उमेदवारी दिली...तरीही विलास शिंदे यांच्यावर अन्याय कसा?

Uddhav Thackrey; Vilas Shinde, who is on the path of Eknath Shinde's party Uddhav Thackeray took a quick decision -एकनाथ शिंदे पक्षाच्या वाटेवरील विलास शिंदे यांची हाकालपट्टी करीत मामा राजवाडे यांची महानगरप्रमुख पदी नियुक्ती झाली.

Sampat Devgire

Shivsena UBT News: गेले दोन आठवडे महानगर प्रमुख विलास शिंदे यांची संशयास्पद भूमिका होती. कधी पक्षावर नाराज असल्याचे सांगत तर कधी नेत्यांवर विश्वास व्यक्त करीत गोंधळात टाकण्याचा प्रयत्न शिंदे यांच्याकडून सुरू होता. त्यामुळे पक्षात राहणार की पक्षांतर करणार याविषयी सगळ्यांचाच गोंधळ होता.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून शुक्रवारी सायंकाळी तातडीने हालचाली झाल्या. महानगर प्रमुख विलास शिंदे हे आधीच ठरल्याप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार आहे. या पदावर तातडीने मामा राजवाडे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे.

मामा राजवाडे हे रिक्षा सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत. शिवसेनेचे उपनेते सुनील बागुल यांचे ते विश्वासू सहकारी आहेत. एका नव्या चेहऱ्याला शिवसेना पक्षाने संधी दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी श्री राजवाडे हे इच्छुक उमेदवार या पार्श्वभूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विलास शिंदे हे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख होते. पहिल्याच टर्मला नगरसेवक म्हणून विजयी झाल्यावर त्यांना प्रभाग सभापती करण्यात आले. त्यानंतर पक्षाचे महापालिकेतील गटनेता म्हणून नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी त्यांना नाशिक पश्चिम मतदार संघाची उमेदवारी देखील देण्यात आली होती त्या निवडणुकीत त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता.

शिवसेनेत भाजप गटनेते दिनकर पाटील यांचे विरोधक म्हणून पक्षाने त्यांना विविध संधी दिल्या. सध्या पक्षांतराचे वारे वाहत आहेत. शिवसेना ठाकरे पक्षाला धक्के बसत आहेत. या स्थितीत शिंदे यांनी आपल्यावर अन्याय झाला, पक्षाने माझ्याकडे दुर्लक्ष केले असा दावा करीत पक्षांतराचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्याबरोबर किती नगरसेवक जातील, हा वादाचा विषय आहे. भाजप पक्षात गेलेले बडगुजर यांनी शिंदे यांना भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे यांच्या कन्येच्या विवाहाला हजेरी लावली होती. त्यानंतरही नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि माजी नगरसेवक विलास शिंदे यांची भेट झाली होती. त्याचवेळी शिंदे यांच्याकडून पक्षांतराचे संकेत मिळाले होते.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT