Aditya Thakre in Nashik meeting
Aditya Thakre in Nashik meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी मिठी मारली, तुम्ही पाठीत खंजीर खुपसला!

Sampat Devgire

नाशिक : चाळीस गद्दारांवर (Rebel) एवढा विश्‍वास ठेवला, की त्यांना मिठी दिली; पण त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेबांच्या विचारांनुसार चालणारे असल्याचे ते सांगतात अन् दुसरीकडे त्यांच्याच मुलाला मुख्यमंत्री (Uddhav Thakrey) पदावरून खाली खेचतात. हिंमत असेल तर राजीनामा द्या अन् निवडणुकीला सामोरे जा, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thakrey) यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर केली. (They bring down Shivsena suprimo`s Son Uddhav Thakrey)

शिवसेनेतर्फे इंदिरानगर येथील मनोहर गार्डन येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिवसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, उपनेते सुनील बागूल, माजी आमदार वसंत गिते, राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यभर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदारापाठोपाठ शिवसेनेचे खासदारही शिवसेनेतून बाहेर पडले. नाशिकचे खासदार हेमंत गोडसेही त्याच वाटेने गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर काय बोलतात, याकडे लक्ष लागले होते. शिवसेनेतील डागडुजीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आदित्य ठाकरे यांनी शिवसंपर्क मेळाव्यात एकजुटीसाठी भावनिक आवाहन केले.

ते म्हणाले, की राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर कधी नागरिकांच्या डोळ्यात अश्रू पाहिले नाही. मात्र पक्षप्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर कितीतरी नागरिकांच्या डोळ्यात मी पाणी पाहिले. निष्ठावान शिवसैनिक हीच शिवसेनेची ओळख आहे. गद्दार आमच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. ते उठाव केल्याचे सांगतात मात्र ही गद्दारीच आहे.

भगवामय वातावरणात घोषणाबाजी

पाचची वेळ असली तरी सायंकाळी साडेसातला मेळावा सुरू झाला. त्यांचे आगमन होताच घोषणाबाजी, शिट्यांमुळे वातावरणात जोश होता. ठाकरे उभे राहिल्यानंतर प्रारंभीचे पाच ते दहा मिनिटे घोषणाबाजीच सुरू होती.

सरकार घटनाबाह्य

राज्यात अतिवृष्टी झाली असून, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही. हे सरकारच घटनाबाह्य आहे. येत्या दिवसात देशाची स्थिती अस्थिर होण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT