बाळासाहेबांनी सांगितल्या एकनाथ शिंदेंच्या दोन चुका... ज्यामुळे राज्यही गोत्यात!

Balasaheb Thorat : राज्यातील जनता टाहो फोडते आहे, भाजप मात्र राजकीय गोंधळात मग्न.
Balasaheb Thorat
Balasaheb ThoratSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून मोठी कायदेशीर चूक केली आहे. ते भाजपच्या (BJP) नादाला लागले ही त्यांची दुसरी चूक आहे. त्यांच्या या चुकीमुळे राज्यात राजकीय गोंधळाची स्थिती आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्यात सरकार स्थापन करूच शकणार नाही, असा दावा काँग्रेसचे (congress) नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला. (People are in trouble & Shinde, Fadnavis busy political mess)

Balasaheb Thorat
ओबीसींची लढाई अद्याप संपलेली नाही, लढा सुरुच राहील!

काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना `ईडी`ने राजकीय सुड भावनेतून समन्स बजावले आहे. यामध्ये केंद्र सरकार राजकीय डावपेचांसाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर करीत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. त्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनासाठी ते नाशिकला आले होते.

Balasaheb Thorat
हेमंत गोडसे गेल्याने शिवसेनेला काडीचा फरक पडणार नाही!

यावेळी ते म्हणाले, राज्यात जनता टाहो फोडते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र राजकीय गोंधळात मग्न आहेत. भारतीय जनता पक्षाला जनतेशी काहीही देणे घेणे नाही, त्यांना फक्त राजकीय सुड उगवायचा आहे. त्यामुळे सध्या राज्यात अवघ्या दोघांचेच सरकार आहे.

ते पुढे म्हणाले, हे दोघे कधीही सरकार बनवू शकत नाही. मंत्र्यांना शपथ देऊ शकत नाही. सध्याची अवस्था संपूर्ण राज्यात निर्माण झाली असून लवकरच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, प्रदेश कॉग्रेसतर्फे आज गुरुवारी राज्यात विविध ठिकाणी केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसतर्फे धरणे धरण्यात आले. नाशिकला श्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्रातील कॉग्रेस पदाधिकारी सहभागी झाले. नॅशनल हेराल्ड प्रकरणी चौकशी करणाऱ्या ईडीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे.

श्री थोरात म्हणाले, की नॅशनल हेराल्ड स्वातंत्र्य लढ्यातील असे वृत्तपत्र आहे की, ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेले आहे. ब्रिटीश सरकारविरोधात व भारतीय समाजमनाच्या बाजून त्यांनी सतत भूमिका पार पाडली. आज मात्र विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ईडी, सीबीआयच्या मदतीने क्रूरपणे विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे.

सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षाचा आवाज दडपण्याचे काम सुरु आहे. एका बाजूला प्रचंड महागाई वाढलेली असून यात सर्वसामान्य व्यक्तींचे जीवन जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल वाढले, डिझेल वाढले, गॅस वाढला आता तर जीवनावश्यक वस्तूला सुद्धा जीएसटी लावला. दुधाच्या पदार्थांना जीएसटी लावून केंद्र सरकार सामान्यांच्या खिशातून पैसा काढून घेत आहे.

ओबीसी आरक्षण

महाविकास आघाडी सरकारने ओबीसीची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी नियोजन केले. बांठिया आयोग नेमून अहवाल तयार केला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने योग्य निकाल दिला. ओबीसीच्या हिताचा निर्णय दिलेला आहे. याचे क्रेडिट महाविकास आघाडीला असून भुजबळांच्या चळवळीला त्याचे श्रेय द्यायला हवे असे श्री. थोरात म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com