Nagar News : प्रसिद्ध विधिज्ञ आणि आता मुंबई धारावी झोपडपट्टी लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार अॅड. उज्ज्वल निकम यांच्यावर नगरमधील लोकभज्ञाक चळवळीने निशाणा साधला आहे. राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत असताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड खटल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या चळवळीने केला आहे.
या चळवळीचे ॲड.कारभारी गवळी यांनी यासंदर्भात पत्र काढले आहे. पुणे विशेष न्यायालयाने (Court) 11 वर्षानंतर निकाल दिला. या निकालात पाचपैकी दोघांना जन्मठेप, तर तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. विशेष सरकारी वकील उज्वल निकम या काळात भाजप (BJP) सत्ताधारी यांच्याशी जवळीक ठेवून होते. नरेंद्र दाभोलकर यांच्यानंतर गोविंद पानसरे यांची हत्या झाली. या दोन्ही हत्याकांडात पोलिसांनी तपासावर विशेष, अशी मेहनत घेतली नाही. तपासात अनेक त्रुटी राहिल्या. त्यामुळे या दोन्ही हत्याकांडातील आरोपींना फाशी होण्याऐवजी फायदा मिळाल्याचा आरोप लोकभज्ञाक चळवळीचे कारभारी गवळी यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील सरकारी वकील नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या जवळ असतात. यातून उचित ठिकाणी नेमणुका मिळवल्या जातात. याला उज्ज्वल निकम देखील अपवाद नाहीत, असा आरोप करत निकम यांनी दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्याकांड खटल्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे, या खटल्याला खूप प्रसिद्धी मिळाली आहे,असे खटले आपल्याकडे ओढण्यासाठी ते माहीर आहेत. अजमल कसाबला हजारो डोळ्यांनी पाहिलेले साक्षीदार होते. अशा खटल्यात निकम यांच्याऐवजी दुसरा कोणताही अभ्यासू वकील कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊनच गेला असता, असा टोला देखील कारभारी गवळी यांनी लगावला आहे.
उज्ज्वल निकम पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरणारे वकील आहेत. ते कधीही धारावी झोपडपट्टीच्या कोणत्याही गरिबाच्या कामासाठी वेळ देऊ शकलेले नाहीत. त्यांना खासदार करणे म्हणजे गरिबांसाठी पांढरा हत्ती संसदेत पाठवणे, असा अर्थ होईल, असा गंभीर आरोप कारभारी गवळी यांनी पत्रकात केला आहे. उज्ज्वल निकम यांच्याविरोधात उभ्या असलेल्या माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या अभ्यासू आहेत. त्यांना गरिबांची जाण आहे. विधानसभेत त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक दाखवली आहे. सर्व धर्माचे खरे तत्त्वज्ञान लोकभज्ञाक हेच आहे. सजीवांमध्ये असणारे चैतन्याची पूजा करणे आणि त्यासाठी काम करणे ही बाब उज्ज्वल निकम यांच्या समजण्यापलीकडची असल्याचेही कारभारी गवळी यांनी म्हटले आहे.
(Edited by : Chaitanya Machale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.