Narendra Modi : ...म्हणून मोदींनी गांधी टोपी घालून केलेले भाषण, ठरतोय चर्चेचा विषय!

Loksabha Election 2024 : पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदाधिकाऱ्यांनी गांधी टोपी आणि उपरणं घालून स्वागत केले.
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Farmers politics news: लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी दिंडोरी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा झाली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी झालेली ही सभा एका वेगळ्याच कारणाने चर्चेचा विषय ठरली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक आणि अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने देशभर फिरत असतात. नागरिक तसेच भाजपचे आणि मित्र पक्षांचे नेते त्यांचे विविध प्रकारे स्वागत करतात. महाराष्ट्रात दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलेले स्वागत वादाचा विषय ठरला होता. पटेल यांनी मोदींना छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक असलेला जिरे टोप मोदींना दिला होता. त्यामुळे पटेल टीकेचे लक्ष्य झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Modi
Narendra Modi News : कांद्याच्या राजधानीत पीएम मोदींची मोठी घोषणा; म्हणाले, पाच वर्षात...

या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान मोदी यांचे भाजपच्या(BJP) पदाधिकाऱ्यांनी गांधी टोपी आणि वारकऱ्यांचे उपरणे देऊन स्वागत केले. यावेळी नांदगावच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धनगर समाजाचे प्रतीक असलेली घोंगडी आणि काठी देऊन स्वागत केले. या आगळ्या स्वागताने उपस्थित त्यांनीही टाळ्या वाजवून त्याला प्रतिसाद दिला.

सामान्यतः पंतप्रधान मोदी(PM Modi) आणि भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रपिता महात्मा गांधींचे टीकाकार मानले जातात. मात्र पिंपळगावला त्यांनी आपले सबंध भाषण गांधी टोपी घालून केले महाराष्ट्रात गांधी टोपी ही महात्मा गांधींची विचारसरणी आणि वारकरी यांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे मोदी यांनी सबंध भाषण गांधी टोपी घालून केले.

PM Modi
PM Narendra Modi : नाशिकमधून मोदींनी पुन्हा ठाकरे- पवारांना डिवचलं; 'नकली राष्ट्रवादी, नकली शिवसेना काँग्रेसमध्ये...'

पंतप्रधान मोदी यांनी पिंपळगाव येथील सभेत प्रामुख्याने काँग्रेस पक्षाला लक्ष केले. काँग्रेसवर टीका करताना हा पक्ष विरोधी पक्ष नेते पदासाठी आवश्यक असलेल्या जागा देखील मिळवू शकणार नाही. या पक्षाचे आजची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यांना जनतेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे ते आता धार्मिक मुद्द्यांचा आणि अगदी मुख्य प्रवाहाच्या विरोधात जाऊन आरोप करीत आहेत. मोदी हे त्यांचे एकमेव विरोधाचे कारण आहे, असे ते यावेळी म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com