Bhujbal-Kande
Bhujbal-Kande Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

भुजबळांच्या विरोधातील तक्रार मागे घे : आमदार कांदेंना छोटा राजन टोळीचा फोन

Sampat Devgire

नाशिक : नांदगाव (Nandgaon) मतदारसंघाच्या `डीपीडीसी`च्या (DPDC) निधी (Funds) वाटपावरून सुरु झालेला सुहास कांदे (Suhas Kande) विरुद्ध छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) वाद आता अंडरवर्ल्ड पर्यंत पोहोचला आहे. यासंदर्भात दाखल केलेली याचिका (Suit in High court) मागे घेण्यासाठी आपल्याला अंडरवर्ल्ड डॅान छोटा राजनच्या (Chhota Rajan) मानसांनी फोन करून धमकावले, असा दावा शिवसेना आमदार कांदे यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

नांदगाव मतदारसंघाच्या विकासकामाच्या आढावा बैठकीत यापूर्वी जिल्हा नियोजन मंडळाच्या कामांच्या वाटपात नांदगावचा निधी अन्यत्र वळविण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री भुजबळ यांनी निधीचा विनियोग नीट केलेला नाही. तसेच दहा कोटींच्या कामांचा निधी परस्पर कंत्राटदारांना दिल्याचा आरोप केला होता. त्यावरून सुरु झालेला वाद अद्याप संपलेला नाही. दिवसेंदिवस तो वाढतच चालला आहे.

यासंदर्भात कांदे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाकळ केला आहे. त्याची अद्याप सुनावणी झालेली नाही. त्यावरून सुरु झालेला वाद आज वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार आली आहे. त्यानुसार हा खठला मागे घ्यावा यासाठी छोटा राजन यांचा पुतण्या अक्षय निकाळजे यांने ९६६४६६६६७६ या क्रमांकावरून दुरध्वनी केला. हा खटला मागे घ्या, अन्यथा आमच्याशी गाठ आहे, असे धमकावले. असे नाशिक पोलिसांत दाखल तक्रारीत म्हटले आहे.

यासंदर्भात आमदार कांदे यांच्याशी संपर्क केला असता, आपण मुंबईत आहोत. संबंधीत प्रकरणाला त्यांनी दुजोरा दिला. याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान यासंदर्भात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी संपर्क केला असता ते मंत्रीमंडळाच्या बैठकीत होते. त्यामुळे त्यांची प्रतिक्रीया सजमू शकली नाही. मात्र एकंदरच नांदगाव मतदारसंघातील हे प्रकरण आता अधिक व्यापक रूप घेऊ लागल्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT