ShivrajSingh Chauhan
ShivrajSingh Chauhan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

ShivrajSingh Politics : कृषिमंत्री चौहान कांदा प्रश्नासाठी नाशिकला देणार भेट !

Sampat Devgire

Nashik News : लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपची डोकेदुखी कांदा निर्यात बंदीने वाढवली होती या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते शिरीष कोतवाल यांनी मंगळवारी कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेतली.

कांदा निर्यात बंदी आणि घसरलेले दर हा शेतकऱ्यांचा अत्यंत संवेदनशील विषय आहे. या प्रश्नावर राज्यातील सहा ते सात लोकसभा मतदारसंघांमध्ये शेतकऱ्यांनी भाजपचा पराभव केला.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी काँग्रेस (Congress) नेते थेट दिल्लीत दाखल झाले आहेत. नाशिक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिरीष कोतवाल यांनी दिल्लीत कृषिमंत्री चौहान यांची भेट घेतली यावेळी त्यांनी कांद्याचे दर सतत घसरतात त्यामुळे निर्यात बंदी करणे बंद करण्याची गरज आहे. या संदर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा.नाशिकच्या शेतकऱ्यांची ही समस्या आहे.सबंध देशभरातील कांदा उत्पादक सध्या त्रस्त आहेत.त्याची एक संवेदनशील नेते म्हणून आपण दखल घ्यावी.

कांदा आणि द्राक्ष उत्पादकांना केंद्रातील नव्या सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. सध्या केंद्र शासनाकडून निर्यात बंदी करण्यात आली आहे.चाळीस टक्के निर्यात शुल्क आकारण्यात येते, ते मागे घ्यावे. याविषयी तातडीने पावले उचलावी अशी विनंती केंद्रीय कृषिमंत्री चौहान यांना करण्यात आली. नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी हैराण झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यावर तोडगा काढला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांबाबत तीव्र नाराजी आहे.

यासंदर्भात कृषीमंत्र्यांनी कोतवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना पंधरा मिनिटांचा वेळ दिला होता. यामध्ये महत्वपूर्ण अशी माहिती त्यांनी या शिष्टमंडळाकडून जाणून घेतली. विविध विषयांवर चर्चा केली. कांदा उत्पादकांचा प्रश्न समजून घेण्यासाठी मी नाशिकला (Nashik) येईन. त्यावर निश्चितच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देखील त्यांनी दिल्याचे कोतवाल यांनी सांगितले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT