Video Legislative Council Election : विधान परिषदेच्या 4 जागांसाठी मतदान; महायुती अन् महाविकास आघाडीच्या कोणत्या उमेदवारांमध्ये चुरस?

Mahayuti Vs Mahavikas Aghadi Legislative Council Election : काही ठिकाणी शिक्षक मतदारसंघात महायुतीनं एकमेकांविरोधात उमेदवार उभे केले आहेत. तर महाविकास आघाडीनं एकास-एक उमेदवार दिले आहेत.
devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar
devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawarsarkarnama

Maharashtra Politics : लोकसभेनंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी आज निवडणूक पार पडत आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक पार पडत आहे.

चारही जागांची मुदत 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यासाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील सुशिक्षित मतदारांचा कौल कोणाला हे 1 जुलैला समजणार आहे.

मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात महायुती एकसंघपणे सामोरे जात आहे. तर, मुंबई आणि कोकण शिक्षक मतदारसंघात महायुतीनं एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत. ही रणनीती असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात आला आहे.

पण, यात कोणती रणनीती हे निकालानंतर स्पष्ट होईल. तर, महाविकास आघाडीनं (Mahavikas Aghadi) महायुतीच्या विरोधात एकास-एक उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar
MNS News : मनसेकडून विधानसभेची तयारी सुरु; 225 मतदारसंघात नेमणार निरीक्षक

मुंबई शिक्षक मतदारसंघ -

जगन्नाथ अभ्यंकर : शिवसेना ठाकरे गट

शिवनाथ दराडे : भाजप

सुभाष मोरे : शिक्षक भारती

शिवाजी शेंडगे : शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार

शिवाजी नलावडे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट

मुंबई पदवीधर मतदारसंघ -

अनिल परब : शिवसेना ठाकरे गट

किरण शेलार : भाजप

devendra fadnavis eknath shinde ajit pawar nana patole uddhav thackeray sharad pawar
MNS News : मनसेकडून विधानसभेची तयारी सुरु; 225 मतदारसंघात नेमणार निरीक्षक

कोकण पदवीधर -

कोकण पदवीधर मतदारसंघांत प्रामुख्यानं दोन उमेदवारांमध्ये लढत

निरंजन डावखरे : भाजप

रमेश कीर : काँग्रेस

नाशिक शिक्षक मतदारसंघ -

किशोर दराडे : शिवसेना शिंदे गट

संदीप गुळवे : शिवसेना ठाकरे गट

महेंद्र भावसार : राष्ट्रवादी अजित पवार गट

विवेक कोल्हे : अपक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com