Unmesh Patil Vs Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Unmesh Patil News: गिरीशभाऊ, तोंड सांभाळून बोला, जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही; भाजपला सोडचिठ्ठी दिलेले खासदार...

कैलास शिंदे

Jalgaon News: गिरीश महाजन (Girish Mahajan) हे राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीही केलेले नाही, शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळाले नाही,पोखरा योजनेचा लाभ मिळालेला नाही, गिरणा बलून बंधाऱ्यासाठी निधी मिळवू शकलेले नाहीत. कॅबिनेटमध्ये त्यांनी हे विषय कधीच लावून धरलेले नाहीत, कॅबिनेटची बैठक होते त्यावेळी हे झोपा काढत असतात. बाहेर मात्र आपल्यावर टीका करीत असतात त्यांनी आता तोंड सांभाळून बोलावे आपण अधिक खोलात गेलो तर त्यांना जामनेरमधून बाहेर पडू देणार नाही," असा खणखणीत इशारा भाजपमधून शिवसेनेत गेलेले माजी खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्षातून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच ते पत्रकारांशी बोलत होते. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत उपस्थित होते. जळगाव जिल्हा बँकेतर्फे शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सोसायट्या तर्फे कर्ज देण्याबाबत जे धोरण आखण्यात आले आहे. त्यावर त्यांनी टीका केली. गटसचिवांना दोष देवून त्यांच्यावर बँकेमार्फत अन्याय केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्हा बँकेच्या या धोरणामुळे आज शेतकरी व गटसचिवांना आत्महत्येची वेळ आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. यासाठी जिल्हा बँकेचे व्यवस्थापन जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सत्तेच श्रेय घेता मग प्रश्‍नाकडे लक्ष द्या

उन्मेश पाटील म्हणाले, "जिल्हा बँकेत फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता आणल्याचे श्रेय महाजन घेत आहेत. मग त्यांनी आता शेतकऱ्यांच्या कर्जाचा आणि विविध कार्यकारी सोसायटीच्या गटसचिवांचा जो प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मंत्री म्हणून याकडे मात्र ते दुर्लक्ष करीत आहेत. जिल्ह्यातील २१ हजार शेतकरी आणि साडेतीनशे गटसचिवांचा भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात सहकार मंत्रालय निर्माण करण्यात आले. अमित शहा त्या खात्याचे मंत्री आहेत. ते शेतकऱ्यासाठी निर्णय घेत असतांना जिल्ह्यातील मंत्री मात्र त्यांच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर जामनेरबाहेर फिरू देणार नाही

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या आदेशाला जिल्ह्यात काळे फासले जात आहे. उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस शेतकरी हितासाठी मोठ मोठी घोषणा करीत आहे परंतु त्यांचे दूत असलेले मंत्री गिरीश महाजन मात्र त्यांच्या विरोधी निर्णय घेत आहेत. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यासाठी काहीही करीत नाही, पोखरा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही, शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही, जिल्ह्यात गिरणा नदीवर बांधण्यात येणाऱ्या बलून बंधाऱ्यासाठी निधी सुध्दा त्यांनी कॅबीनेट बैठकीत मंजूर करून आणला नाही. इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांनी आपला जिल्हा चांगला केला आहे. हे मात्र कॅबीनेटमध्ये काय झोपा काढतात काय? असा सवालही त्यांनी केला आहे. महाजन हे केवळ भाषणे देऊन टीका करीत असतात. त्यांनी आता सांभाळून बोलावे आपण जर खोलात गेलो तर जामनेरमधून बाहेरही निघू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT