Ramdas Athawale News : समाजातील वंचित घटकांना जोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी ही चांगले काम करत आहे. पण आमच्या रिपल्बिकन पार्टीशिवाय वंचित आघाडी पूर्ण होऊ शकत नसल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले. (RPI leader Ramdas Atahawale appriciate Vanchit Aghadi activities for Siciety)
केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचीत बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) कामकाजाचे कौतूक केले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षरित्या प्रकाश आंबेडकरांना (Prakash Ambedkar) साद घालत वंचित बहुजनसोबत जाण्याचा विचार व्यक्त केला.
दलित पॅंथरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, पॅंथरची लढाई ही कुठल्या जाती, धर्माविरोधात नसून समाजात समानता प्रस्थापित करण्यासाठी आहे. आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही कदापी सहन करणार नाही. सर्वसामान्य व्यक्तींच्या न्याय, हक्कांसाठी पॅंथर व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे यापुढे एकत्रिपणे काम करतील.
श्री. आठवले यांनी आपल्या खास शैलीत भाषणाची सुरवात केली. 'मी कधी बोलत नाही खोट, म्हणून मला 'पॅंथर'ने केलं मोठं' अशी कविता त्यांनी सादर केली. पॅंथरची लढाई ही सर्वसामान्य व्यक्तींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आहे. ही चळवळ चालवत असताना अनेकदा जेलमध्ये गेलो. जेलमध्ये जाण्यासाठी आम्ही कधी घाबरलो नाही.
रिपब्लिकन पक्षात अनेक गट असले तरी बाबासाहेबांचा एक विचार सर्वांच्या मनात आहे. माझ्याविरोधात कुणीही बोलत असले तरी माझे काम सुरू आहे. त्यांच्या बोलण्यामुळे मला काही फरक पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ता मिळवण्यासाठी पक्षाचे आमदार, खासदार निवडून आले पाहिजे. त्यासाठी इतर समाजाची मते आपल्याला मिळाली पाहिजे, यादृष्टीने आपण काम करायला हवे असे आवाहनही त्यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पॅंथर चळवळीत कार्य केलेल्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी `आरपीआय`चे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, अर्जुन डांगळे, गौतम सोनवणे, विठ्ठल शिंदे, शीला गांगुर्डे, श्रीकांत भालेराव, अर्जुन पगारे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.