Sujat Ambedkar questions caste Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sujat Ambedkar : Gen Z च्या आंदोलनातही जातीय मानसिकता? सुजात आंबेडकरांचा मोठा आरोप

Sujat Ambedkar questions caste inclusivity in Gen Z-led youth movements over paper leak protests : पेपरफुटीविरोधी आंदोलनाचा दाखला देत सुजात आंबेडकरांचा दावा; आंबेडकरवादी तरुणांना वैचारिक पातळीवर एकटे पाडले जात असल्याचे मत

Pradeep Pendhare

Sujat Ambedkar Gen Z Movement : पेपरफुटीच्या विरोधात मोठे आंदोलन उभे केल्यामुळे देशातील युवा पिढीकडून मोठ्या बदलांच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. देशभरातून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर मोठ्या संख्येने विद्यार्थी दाखल झाले आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी पेपरफुटीच्या प्रश्नावर आवाज उठवला. एवढेच नव्हे तर आपल्या मागण्या मान्य करायला सरकारला भाग पाडले.

वरकरणी सर्वसमावेशक वाटणाऱ्या या आंदोलनाचा दाखला देत वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुजात आंबेडकर यांनी जातीवाद संपला नसल्याचे म्हटले आहे. जेन झी (Gen Z) पिढीच्या आंदोलनांमध्येही जातीय मानसिकता कायम असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आधुनिक प्रक्रियेतदेखील आंबेडकरवादी तरुण वैचारिक पातळीवर एकटा पडत चालला आहे, असे मत त्यांनी मांडले. अहिल्यानगर येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते.

युवकांच्या प्रत्यक्ष मैदानावर होणारे असो वा डिजिटल प्लॅटफॉर्मवर असो कोणत्याही आधुनिक आंदोलनांमध्ये वरवर सर्वसमावेशकता दिसत असली, तरी प्रत्यक्षात सामाजिक न्यायाचा मुद्दा उपस्थित केल्यावर आंबेडकरवादी युवकांकडे दुर्लक्ष केले जाते, असे गंभीर आरोप 'वंचित'चे (VBA) सुजात आंबेडकर यांनी केला.

सुशिक्षित आणि आधुनिक मानल्या जाणाऱ्या नव्या पिढीतही जुन्या रूढीवादी आणि जातीय मानसिकतेचे अवशेष कायम असल्याचे निरीक्षण नोंदवता, संविधानात्मक हक्क आणि समतेची भाषा बोलणाऱ्या आंबेडकरवादी युवकांन मुख्य प्रवाहात सामावून घेण्याऐवजी त्यांच्या विरोधात एक प्रकारची वैचारिक भिंत उभी केली जात आहे, या गंभीर मुद्याकडे लक्ष सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी वेधले.

बहुजन आणि शोषितांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या युवकांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी त्यांना एकटे पाडण्याचे षडयंत्र पद्धतशीरपणे रचले जात आहे. मुस्लिम, ख्रिस्ती, बौद्ध, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजाला वेगवेगळे करून लक्ष्य केले जात आहे. अन्यायाविरोधात प्रत्येक समाजाने दुसऱ्या समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. भाजपकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयोग केले जात असल्याचा आरोप करत हा प्रयोग हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन सुजात आंबेडकर यांनी केले.

सोशल मीडियावर तीव्र चर्चा

सुजात आंबेडकर यांनी मांडलेल्या या भूमिकेनंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आणि विशेषतः सोशल मीडियावर यावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. डिजिटल माध्यमांवर तरुणांच्या दोन गटांमध्ये यावरून मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला, "आधुनिक आंदोलनांनी सर्वसमावेशक असले पाहिजे," असे मत व्यक्त होत आहे, तर दुसरीकडे, "तरुण पिढीने जुन्या जातीभेदाच्या भिंती ओलांडून पुढे गेले पाहिजे," अशी तीव्र भावना उमटत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT